ताज्या घडामोडी

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा वाली कोण ?

Spread the love

कदेर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत
प्राथमिक आरोग्य केंद्रालाच रिक्त पदाचे गृहण बातमीदार उपकेंद्राचा कारभार प्रभारीवर मुरुम, ता. उमरगा, ता. २० (महेश मोटे, प्रतिनिधी) : तालुक्यातील कदेर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे दार बंद स्थितीत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात बी.ए.एम.एस. डॉक्टरची नेमणूक केली होती परंतु ते गेले कोठे ? आरोग्य कर्मचारी आरोग्य सेवक २०१६ साली कदेर येथून बदली होऊन गेले. परंतु त्या ठिकाणी अद्याप दुसऱ्याची नेमणूक होऊ शकली नाही. नवीन आरोग्य सेवक या ठिकाणी देण्यात आले नाहीत. चार महिन्यापुर्वी बदलीमुळे रिक्त झालेल्या आरोग्यसेविका या पदावर इतरांची नेमणूक झाली नाही. चार्ज देण्यात आलेल्या प्रभारी अधिकारी व कायम आरोग्यसेविका व आरोग्य सहायक या ठिकाणी वास्तव्यास नाहीत. या आरोग्य उपकेंद्रात कोणकोणत्या प्रक्रिया होतात. आरोग्य केंद्र हेच कदाचित गावाला सगळयात जवळचे उपचाराची सोय असलेले ठिकाण असते. आपल्या उपकेंद्रात एक नर्सताई आणि एक बहुउद्देशीय कार्यकर्ता असतो. त्यांची मुख्य कामे अशी जीवघेण्या सहा आजारांपासून बाळाचा बचाव करण्याकरता लसीकरण,
गरोदर स्त्रियांची तपासणी, सोपी बाळंतपणे आणि बाळंतपणानंतरची योग्य काळजी. जोडप्यांना पाळणा लांबविण्याची आणि कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांची माहिती देणे. मलेरिया, टी.बी., कुष्ठरोग यावर उपचार करणे. साध्या-मध्यम आजारांवर उपचार करणे,
अंगणवाडया आणि शाळांमध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी करणे. हगवण, न्यूमोनिया यासारख्या घातक आजारांवर उपचार आणि लहान मुलांची इतर काळजी. स्वच्छता आणि पाणी शुध्दीकरण याबाबत सल्ला देणे. नर्सताई आणि बहुउद्देशीय कार्यकर्ता यांचे काम कठीण असते. त्यांच्याकडची गावे ही आठ ते दहा किलो मीटरच्या परिसरात पसरलेली असतात. बऱ्याचदा त्यांना याठिकाणी पाई जावे लागते. घरोघर भेटी देऊन काही सेवा देतात तर अंगणवाडीत लसीकरण करतात. ते आरोग्य कार्यक्रमांचा मासिक अहवाल तयार करतात. त्यांना दरमहा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बैठकांना उपस्थित राहावे लागते. आता प्रत्येक उपकेंद्रास आणखी एक नर्सताई नेमलेली असते.
अंगणवाडी प्रत्येक गावात १००० वस्तीला एक अंगणवाडी असते. अंगणवाडीत जरी ३-६ वयोगटातली मुले येत असली तरी त्यापेक्षा लहान ०-३ बालकांनाही सेवा मिळाव्यात अशी अपेक्षा असते. याचबरोबर गरोदर व स्तनदा माता अंगणवाडीत तपासणीसाठी आणि पोषक आहारासाठी येतात. पोषण, पूर्व प्राथमिक शिक्षण, लसीकरण, आरोग्य शिक्षण आणि आरोग्य तपासणी ही अंगणवाडीची महत्त्वाची कामे आहेत. प्रत्येक महिन्यात एक दिवस हा आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. प्राथमिक आरोग्य केंद्राला व उपकेंद्राला२००७ पासून महाराष्ट्रात आशा योजना लागू केलेली आहे. सुरुवातीस ही योजना फक्त आदिवासी भागात होती. २००९ पासून इतर ग्रामीण भागातही ही योजना लागू झालेली आहे. शहरी भागात आरोग्य कार्यकर्त्या नेमल्या गेल्या. मात्र त्यांना आशा ऐवजी ‘उषा’ असे नाव असेल. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात गावपातळीवर आशा कार्यकर्तीचे खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रात आशाची निवड ग्रामपंचायत ग्रामसभेकडून होते. १० वी झालेल्या स्त्रियांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना निरनिराळया कामांसाठी मोबदला मिळतो. त्यातून त्यांना महिन्याला सुमारे १००० ते १५०० रुपये मिळावेत अशी अपेक्षा आहे. त्यांच्याकडून गावाच्या सर्वांगीण आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाची कामे अपेक्षित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!