आरोग्य व शिक्षण

नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या पुढाकारातून वडगाव शहरातील 50 वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न मार्गी 

Spread the love

वडगाव : वडगाव शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील भिलारे वस्ती भागातून साधारणत: पन्नास वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रलंबित प्रश्न नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पुढाकारातून मार्गी लागला आहे. स्थानिक नगरसेविका सुनिता भिलारे, नगरसेवक दीपक म्हाळसकर, यांच्या सहकार्याने स्थानिक जागामालक लहू भिलारे, संतोष भिलारे, प्रशांत भिलारे,दिलीप म्हाळसकर, हनुमंत म्हाळसकर, मधुकर म्हाळसकर, गणेश म्हाळसकर, अरुण भिलारे या शेतकऱ्यांबरोबर मध्यस्थी करत मार्गी लावला आहे.

या भागातील रस्ता, कॉंक्रिटीकरण व बंदिस्त ड्रेनेज लाईन या विकासकामांसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान निधीतून सुमारे 47 लाख 37 हजार रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे.या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सर्व जागामालक शेतकऱ्यांचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी आभार मानले.

यावेळी नगरसेवक राजेंद्र कुठे, दिलीप म्हाळसकर, सुनिता भिलारे, खंडू भिलारे, रामभाऊ भेगडे, अरुण भिलारे, सुदाम भिलारे, बाळासाहेब भिलारे, गोपाळ भिलारे,सूर्यकांत भिलारे, सद्गुरु भिलारे,सागर म्हाळसकर, कल्पेश भोंडवे आदी उपस्थित होते.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!