ताज्या घडामोडी

पावसच्या स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिरमध्ये ‘ इंग्लिश लँग्वेज डे ‘ मोठ्या उत्साहात साजरा

Spread the love

पावस :– रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर प्रशालेत विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती दूर व्हावी व इंग्रजी विषयाची गोडी निर्माण व्हावी व या उद्देशाने नुकताच इंग्लिश लँग्वेज डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती व विल्यम शेक्सपिअर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर कलाविहार मंडळाचे सभापती श्री काटे व्ही.बी. यांनी प्रास्ताविक केले.या कार्यक्रमामध्ये प्रशालेतील इयत्ता पाचवी ते अकरावीपर्यंतचे तब्बल ५० विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून भाषणे केली.जगप्रसिध्द असणार्या महान कवी, लेखक, नाटककार, कादंबरीकार विल्यम शेक्सपिअर यांचा वाढदिवस हा इंग्लिश लँग्वेज डे म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख वक्त्या सौ स्मिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचं महत्त्व तसेच इंग्रजी भाषा बोलण्यासाठी काय उपाययोजना करावी या बद्दल विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्यानंतर सौ बोरवणकर मॅडम मुख्याध्यापिका सौ प्रिया गावडे व पर्यवेक्षक बी विमाने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचलन सौ.राजश्री सावंत यांनी केले तर सौ सोनाली सावंत हिने आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. संपूर्ण कार्यक्रम इंग्लिश टू इंग्लिश झाला.या वेळी कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ प्रिया गावडे पर्यवेक्षक श्री बी. बी.माने, संस्था सचिव व सहा. शिक्षक श्री हरीश सामंत व कलाविहार मंडळाचे सभापती श्री व्ही. बी. काटे सौ समिधा नार्वेकर सौ सुरेखा जाधव, सौ ताई फराटे , सौ सोनाली सावंत, सौ राजश्री सावंत, सौ शेलार मॅडम व इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!