ताज्या घडामोडी

शिराळ्यात युवाशक्ती दुर्गाउत्सव मंडळाची आकर्षक सजावट

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा शहरातील वसाहतवाडी प्रभागातील युवा-शक्ती दुर्गा उत्सव मंडळामार्फत आकर्षक गडकोट किल्ल्याच्या सजावटीवर दुर्गामाता युवराजमान झाल्याचा देखावा साकारण्यात आला आहे. शहरासह परिसरातील अनेक लोक या ठिकाणी भेट देऊन नवरात्रीनिमित्त बसवण्यात आलेल्या दुर्गामातेचे दर्शन घेत आहेत. त्यामुळे शहरातील वसाहतवाडी प्रभागात दुर्गा मातेच्या दर्शनाला भाविकांची गर्दी होत आहे.

या ठिकाणी दर्शनाच्या निमित्ताने
आरतीला येणाऱ्या महिलांच्या पैकी रोज 3 महिलांना मिळणार आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहेत. तसेच हिंदी मराठी गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम या मंडळाने आयोजित केला आहे.

आकर्षक सजावट आकर्षक मूर्ती व येणाऱ्या भाविकांना दर्शन घेण्याकरता मंडळाचे कार्यकर्ते अवधूत इंगवले,गजानन पाटील,धनाजी चव्हाण,रामदास माने,अक्षय सुतार,पंकज हवालदार,मंगेश लोहार,सागर लोहार,अमित पाटील,सचिन माने,कीर्ती लोहार,विवेक लोहार,विक्रम लोहार,मातीन मुल्ला,गौरव लोंढे,राहुल गायकवाड आदी झटत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!