ताज्या घडामोडी

स्वरूपाचा वाढदिवस किराणा किट वाटून झाला साजरा

Spread the love

मुंबई-गुरुनाथ तिरपणकर

जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते महेश बागवे यांचे चिरंजीव स्वरूप याचा दहावा वाढदिवस बागवे परिवाराने अकरा दृष्टीहीन कुटुंबियांना किराणा किट वाटून साजरा केला.मागील तीन चार वर्षे बागवे परिवार समाजातील गोर-गरीब, वंचित लोकांना किराणा किट वाटून स्वरूपाचा वाढदिवस साजरा करत आहेत. मला पुरेल एवढं ईश्वराने मला दिल असून त्यातून काही भाग हा समाजासाठी असावा या दृष्टिकोनातून आम्ही जमेल तसं वंचितांना सहकार्य करीत आहोत अशी भावना यावेळी स्वरूपचे वडील महेश यांनी बोलून दाखवीली.याआधी ही बागवे यांनी स्वतः पुढाकार घेऊन अनेक मित्रांना एकत्र करीत वृद्धाश्रम, अनाथालय,आश्रमशाळा यांना अनेकदा मदत पोहचविली असून आमचे हे काम असेच सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.किराणा किट वाटप करताना सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!