ताज्या घडामोडी

मांगले येथे उज्वल गँस योजनेअंतर्गतमहिलांना मोफत कनेक्शन वाटप

Spread the love

उज्वला गँस योजनेअंतर्गत मांगले येथे 160 महिलांना मोफत भारत गँस कनेक्शन वाटप सावित्री गराडे व विराज गँस एजन्सीचे अधिकारी बी एस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
भारत गँस वितरक विराज गँस एजन्सी कोडोली यांच्या माध्यमातून व मांगले येथील गँस वितरण सेवा केंद्र चालक विजय गराडे यांच्या विशेष प्रयत्नातुन प्रधानमंत्री उज्वला गँस योजनेतुन मांगले कांदे देववाडी लादेवाडी ता. शिराळा येथील 160 महिलांना मोफत भारत गँस कनेक्शन (भरलेली सिलेंडर टाकी, शेगडी, पाईप ,रेग्युलेटर )वाटप केल्यामुळे महिलांच्या तुन समाधान व्यक्त होत आहे. यावेळी गँस वितरण सेवा केंद्राचे चालक विजय गराडे म्हणाले उज्वल गँस योजनेअंतर्गत 160 महिलांना उज्वल गँस कनेक्शन मंजुर झाले आहेत तिन टप्प्यात महिलांना मोफत कनेक्शन वाटप केलेले आहे उज्वल गँस योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करुण तळागाळातील सर्व सामान्य महिलांना मोफत गँस मिळवुन देण्यासाठी प्रभावीपणे काम करणार आहे यावेळी यावेळी गँस एजन्सी चे अधिकारी बी एस पाटील प्रा भिमराव गराडे पाटील प्रा दिपक तडाखे दिलीप चौगुले अशोक दशवंत विजय महाजन पप्पू महाजण यांच्या सह महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते विराज गँसचे अधिकारी दिलीप खटावकर यांनी गँस कनेक्शन बाबत माहिती महिलांना माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!