ताज्या घडामोडी

ऐरोस्केटोबॉल च्या स्पर्धेस उत्कृष्ट प्रतिसाद

Spread the love

बोरीवली स्केटिंग स्पोर्टस क्लब, पार्थ इंडिया स्पोर्टस फाउंडेशन आणि ऐरोस्केटोबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संयुक्त रित्या दिनांक २७ व २८ एप्रिल २०२२ रोजी आयोजित केलेल्या खुल्या ऐरोस्केटोबॉल स्पर्धेत रेस स्केटींग अकँडमी , इंडिया रोलर स्केट्स, साशा स्केटींग स्कूल अकँडमी ऐरोस्केटोबॉल मुुंबई उपनगर या संघानी सहभाग नोंदवला होता.

रेस स्केटींग अकँडमी व इंडिया रोलर स्केट्स या झालेल्या सामन्यामध्ये इंडिया रोलर स्केट्स अकँडमी या संघाने ९ गुणाने रेस स्केटींग अकँडमीया संघावर बाजी मारली. इंडिया रोलर स्केट्स अकँडमी कडून क्रिस शाह, हरर्शित सुराना, रिद्या शाह, हिया वाजा, विहांग मिस्त्री, रितीशा मोटे, ध्रुमिल कपाडिया, चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. तसेच रेस स्केटिंग अकँडमी कडून समर्थ चव्हाण, सोनाक्षी चव्हाण, काव्या पटेल, सार्थक पांगरे ह्या खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.


रेस स्केटिंग अकँडमी व साशा स्केटिंग स्कूल अकँडमी झालेल्या स्पर्धेत रेस स्केटिंग अकँडमी तर्फे लेख पटेल, विहांग केणी, प्रिना देसाई, जय मंधारे, वर्णिका भार्यवाल, दुनिका रजक ह्यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले आणि साशा स्केटिंग अकँडमी कडून विहांग गोयल, खुशाल रेवडेकर, श्रीधर नाडार, पियर बांगर, चित्रा डांगे, वेरुशका उमेश, साशा डांगे ह्यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शन केले.
ऐरोसस्केटोबॉलची स्पर्धार संपन्न होण्याकरिता प्रामुख्याने श्री. सुनील राणे (आमदार- बोरिवली विधानसभा) ह्यांनी सहकार्य केले. तसेच श्री. वरुण श्रीकार, प्रथमेश चिंचणकर, राज सिंग, विजय डांगे, भामीनी शाह, पिंकी मॅडम ह्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा संपन्न झाली.ऐरोसस्केटोबॉल संघटने कडून श्री सुनील कॉड्रस, अलेक्स चेट्टी, श्याम चौधरी यांनी निरीक्षक म्हणून काम पाहीले.
ऐरोसस्केटोबॉल हा खेळ भारतातुन उगम होऊन आता २६ ते २८ राज्यात खेळला जातो. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाने देखिल या खेळास मान्यता देवून ह्याचा नॅशनल ओरिएंटेशन शिबिर आयोजित केले होते. हा खेळ लवकरच महाराष्ट्रात देखिल शालेय स्तरावर सामिल होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!