ताज्या घडामोडी

आष्टा येथे आष्टा शहर राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार सेलच्या वतीने शहरातील असंघटीत कामगारांना सुरक्षा संच व कल्याण कारी मंडळाच्या योजनांच्या लाभ वाटप

Spread the love

आष्टा दि.१ प्रतिनधी
राज्य सरकार ज्याप्रमाणे राज्यातील बांधकाम क्षेत्रातील असंघटीत कामगारांना विविध लाभ व सोई-सुविधा देत आहे, त्याप्रमाणे इतर क्षेत्रातील मजुरांनाही विविध लाभ व सोई-सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे,असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांनी आष्टा येथे व्यक्त केला.
आष्टा येथे आष्टा शहर राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार सेलच्या वतीने शहरातील असंघटीत कामगारांना सुरक्षा संच व कल्याण कारी मंडळाच्या योजनांच्या लाभ वाटप प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे,माजी अध्यक्ष दिलीपराव वग्याणी,सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव,संघटनेचे मार्गदर्शक,माजी नगराध्यक्ष सुभाषराव सुर्यवंशी,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील,आष्टयाचे माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले,संचालक विराज शिंदे, संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर चव्हाण, उपाध्यक्ष अविनाश गायकवाड,बाबलाल मुजावर,जिल्हा संघटक निवास गायकवाड, शहराध्यक्ष खंडू चव्हाण,कार्याध्यक्ष प्रकाश पवार प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील,स्व.विलासराव शिंदे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
ना.पाटील म्हणाले,आम्ही पूर्वी सत्तेत असताना ना.हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून बांधकाम क्षेत्रातील असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी हे मंडळ स्थापन केले आहे. राज्यातील बांधकामा तून सेस जमा केला आहे. पूर्वी २ हजार कोटी असणारा हा सेस साडे चौदा कोटी रुपयांवर गेला आहे. आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही योजना अधिक व्यापक केली आहे. आष्टा शहरासह जिल्ह्या तील जास्तीत-जास्त बांधकाम क्षेत्रातील असंघटीत कामगारांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.
सुभाषराव सुर्यवंशी म्हणाले,ना.जयंतराव पाटील,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्ह्यात मजबूत संघटना उभारणी करीत आहोत. आम्ही गेल्या काही वर्षात हजारो असंघटीत बांधवांना विविध लाभ देवू शकलो,याचे आम्हास समाधान आहे.
वैभव शिंदे म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील असंघटीत कामगारांना संघटीत करून त्यांना न्याय देण्याचे काम करीत आहे. जिल्ह्यात ८० हजार असंघटीत कामगारांची नोंद झाली असून ६० हजारच्यावरती असंघटीत कामगारांना लाभ दिला आहे. शहरातही घर बांधणीस अडीच लाखाच्या वर अनुदान मिळायला हवे.
अनिल गुरव म्हणाले,वाळवा तालुक्यात ६ हजार ५०० च्यावर नोंदणी झाली आहे. समाजात ६२ टक्के असंघटीत कामगार आहेत,त्यांना जन्मापासून मृत्य पर्यंत विविध योजनांचा लाभ देत आहेत. जिल्ह्यात १७ हजार कामगारांना मध्यान्ह भोजन देत आहोत. कामगारांनी मध्यान्ह भोजनासाठी संपर्क करावा. यावेळी झुंझारराव पाटील, संजय पाटील,संचालक विराज शिंदे,भास्कर पाटील,जिल्हा संघटक निवास गायकवाड, तालुका सदस्य प्रवीण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी शहराध्यक्ष खंडू चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तालुका उपाध्यक्ष अविनाश गायकवाड यांनी आभार मानले. ए.के.पाटील (सर) यांनी सूत्र संचालन केले.
यावेळी रघुनाथ जाधव,माणिक शेळके, जनार्दन पाटील,जगन्नाथ बसुगडे,उज्ज्वला पाटील,झीनत अत्तार, तेजश्री बोंडे,प्रतिभा पेटारे,मनीषा जाधव, अर्जुन माने,किरण काळोखे,प्रा.दीपक मेथे,अनिल पाटील,उदय कुशिरे ओंकार जाधव,तालुका कार्याध्यक्ष विक्रम धुमाळ,उपाध्यक्ष बाबासाहेब मुजावर, शहर कार्याध्यक्ष प्रकाश पवार,सुहास माने, रामभाऊ अवघडे यांच्या सह संघटनेचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,तसेच कामगार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!