ताज्या घडामोडी

विश्वासराव नाईक साखर कारखाना येथे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात आज (ता. 1 मे) महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. कारखान्याचे अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थितीत होते. प्रारंभी उपाध्यक्ष पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहन झाले. विश्वास विद्यानिकेतच्या विद्यार्थीनींनी राष्ट्रगीत गायले. कारखान्याच्या सुरक्षा रक्षाकांनी ध्वजास मानवंदना दिली. यावेळी संचालक सवश्री. दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, विश्वास कदम, डॉ. राजाराम पाटील, सुरेश पाटील, सुहास पाटील, संदीप तडाखे, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, यशवंत दळवी, यशवंत निकम, बाबासो पाटील, विष्णू पाटील, तुकाराम पाटील, दतात्रय पाटील, बाळसाहेब पाटील, आनंदा पाटील तसेच कोंडीबा चौगुले, कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थितांना अध्यक्ष नाईक व उपाध्यक्ष पाटील यांनी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!