क्रीडा व मनोरंजनमावळ

खांदेश विकास मंच आयोजित-” नवरात्रउत्सव”- महामृत्युंजय पठण- समाज प्रबोधन आणि शिस्तबद्ध आकर्षक दांडिया नृत्याने संपन्न!

Spread the love

खांदेश विकास मंच आयोजित-” नवरात्रउत्सव”- महामृत्युंजय पठण- समाज प्रबोधन आणि शिस्तबद्ध आकर्षक दांडिया नृत्याने संपन्न!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १८ऑक्टोबर.

तळेगाव दाभाडे शहर- साहित्य कला संस्कृतीने नटलेलं परिपक्व शहर! नुकत्याच सार्वजनिक गणपती उत्सवाच्या निमित्ताने संघटित झालेले खानदेश विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी नवरात्रोत्सव अत्यंत दिमाखात सुरू केला! आरतीच्या निमित्ताने- मूळ खानदेशी असलेल्या ज्येष्ठ डॉक्टर शालिग्राम भंडारी सरांना- विकास मंचने प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानपूर्वक आमंत्रित केले होते! उपस्थित भाविकांना संबोधित करताना डॉक्टर भंडारींनी सर्व कार्यकर्त्यांच्या संघटित कार्यपद्धती विषयी भरभरून कौतुक केले.

खानदेश व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून प्लंबर पासून वायरमेन पर्यंत! नोकरी पासून लग्न जुळवा जुळीपर्यंत! तळेगाव ते खानदेश पर्यंतचा अतिशय अल्प दरात आपल्या सभासदांसाठी मंचने उपलब्ध करून दिलेला प्रवास! या परिवारातील काही दुःखद घटना घडल्यास- विनाविलंब शारीरिक आर्थिक मदतीचा ओघ करून देणे- हे सर्वउपक्रम मी गेले वर्षभर अतिशय जवळून बघत आलो आहे! म्हणूनच हातावर पोट भरणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन एक यशस्वी सहकारी जीवनशैलीच दर्शनच मावळ वासियांना घडविल आहे! म्हणूनच अध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांच्या सर्व टीमचं विशेष कौतुक डॉक्टरांनी आपल्या मनोगतात पुढे व्यक्त केले! याबरोबरच अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले दोन संकल्पही डॉक्टरांनी उपस्थित सर्व खानदेशी बंधू भगिनींकडून सोडवून घेतलेत!या नवरात्रीच्या उत्सवात डॉक्टर भंडारींच्या बरोबरच- विविध क्षेत्रातील मान्यवर- शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते त्यात प्रसिद्ध निवेदक अनिलजी धर्माधिकारी सामाजिक कार्यकर्ते लायन राधेश्याम भंडारी लायन सुनील जैन- तसेच इंदुरीचे माजी सरपंच मधुकरआप्पा ढोरे -सदस्य विनोद भागवत- युवाउद्योजक नंदूसाहेब ढोरे- विश्वकर्मा उद्योजक संस्थेचे नितीन पोटे  या मान्यवरांची आवर्जून उपस्थिती होती.

हा नवरात्रीचा अत्यंत पवित्र समारंभ यशस्वी करण्यास विशेष परिश्रम खानदेश विकास मंचच्या खालील पदाधिकाऱ्यांनी घेतलेत– अध्यक्ष  उमेश पाटील आणि त्यांच्या टीममधील-
पंकज पाटील पंढरीनाथ बोरसे  राकेश भारंबे, शैलेश बडगुजर श्रीमान, सागर पाटील,योगेश पवार,
गणेश सोनवणे,मोतीलाल बापू पाटील रविंद्र बापू पाटील,राजेंद्र पाटील,निशान गांगुर्डे,राहुल पाटील,प्रवीण बडगुजरआणि समस्त खान्देश विकासमंच परिवाराच्या अथक आणि अविरत परिश्रमातूनच हा नवरात्रउत्सव शंभर टक्के यशस्वी झाल्याच समाधान खानदेश विकास मंचच्या सभासदांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!