आरोग्य व शिक्षण

उपनगराध्यक्ष पदी काँग्रेस च्या संध्या खंडेलवाल बिनविरोध !

Spread the love

आवाज न्यूज : लोणावळा नगर परिषद उपनगराध्यक्ष पदाच्या ऑनलाईन निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या संध्या खंडेलवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली
या प्रसंगी या ऑनलाईन निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी काम पाहिले विहित कालावधित संध्या खंडेलवाल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने संध्या खंडेलवाल यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले
अशी ही ऑनलाईन निवडणूक संपन्न झाली
या उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने निरीक्षक म्हणून पुणे जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस पृथ्वीराज पाटील ,आणि बारामती,लोकसभा निवडणूक अध्यक्ष लहू अण्णा निवगुणे हे उपस्थित होते या वेळी यांच्या हस्ते संध्या खंडेलवाल यांचा सत्कार करण्यात आला
याप्रसंगी ऑनलाईन उपनगराध्यक्ष निवडणुकीत लो, न, प, नगरसेवक,श्रीधर पुजारी,राजू बचे,देविदास कडू विशाल पाडाळे दिलीप दामोदरे ,सुधीर शिर्के महिला नगरसेवक रचना सीनकर आरोही तळे गावकर बिंद्रा गणात्रा पूजा गायकवाड सुवर्णा अकोलकर आणि मंद सोनवणे इ सत्ताधारी पक्षाचे सदस्य उपस्तीत होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!