क्रीडा व मनोरंजन

हर्षितची शतकी खेळी व्यर्थ ठाणेवैभव करंडक आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे : इतर फलंदाजांकडून पाहिजे तशी साथ न मिळाल्यामुळे हर्षित जानवडकरने शतकी खेळी करूनही ४३ व्या ठाणेवैभव करंडक आंतरकार्यालयीन टी २० क्रिकेट स्पर्धेत महिंद्र लॉजीस्टिक संघाला रिलायन्स ग्रुप सर्व्हिसेस संघाविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात अवघ्या चार धावांनी पराभव पत्करावा लागला.
सेंट्रल मैदानावर झालेल्या सामन्यात शुभम पुण्यार्थी आणि भूषण मानकरच्या अर्धशतकामुळे रिलायन्स ग्रुप सर्व्हिसेसने २० षटकात ८ बाद १९२ धावा केल्या. शुभमने सहा चौकार आणि तीन षटकारासह ५६ धावा केल्या. भूषणने नाबाद ५३ धावांची खेळी केली. आकाश अय्यरने २५ धावांची खेळी केली. पंकज कोरी, प्रतीक गुप्ताने प्रत्येकी दोन विकेट मिळवली. साहिल मडगावकर आणि उत्कर्ष राऊतने प्रत्येकी एक विकेट मिळवली. उत्तरादाखल हर्षितने खणखणीत २१ चौकार मारत ६७ चेंडूत ११४ धावा केल्या. त्याखालोखाल ईशान अमिनने ३० धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरल्याने महिंद्र लॉजीस्टिक संघाला २० षटकात ४ बाद १८८ धावा करता आल्या. मेघन पेडणेकरने तिन आणि वेदांत खांबेने एक विकेट मिळवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!