क्रीडा व मनोरंजन

मुलांमध्ये अहमदनगदर, मुंबई शहर, परभणी व रत्नागिरी विजयी तर मुलीं मध्ये यजमान पुणे व नासिक संघाची विजयी सलामी.

Spread the love

राज्य निवड कबड्डी निवड चाचणी स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

पुणे- बालेवाडी (पुणे) येथील क्रीडांगणावर पुणे शहर राष्ट्रवादी कॉग्रेस, संदिप बालवडकर स्पोर्टस फाऊंडेशन, चेतक स्पोर्टस् फाऊंडेशन व धर्मवीर कबड्डी संघ यांच्या संसुक्त विद्यवाने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त 48 वी कुमार गट मुले व मुली अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे उद्धाटन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे मुख्य आयोजक संदिप बालवडकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, शकुंतला ख़टावकर, मंगल पांडे, रविंद्र देसाई, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे, सरकार्यवाह रविंद्र आंदेकर, राज्य संघटनेचे व पुणे जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी, स्पर्धा निरिक्षक मदन गायकवाड, पंच प्रमुख सुहास पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कुमार गट मुलांच्या झालेल्या सामन्यात अहमदनगर संघाने यजमान पुणे संघावर 43-32 अशी मात करीत विजयी साकारला. मद्यतराला अहमदनगर संघाकडे 21-16 अशी आघाडी होती. अहमदनगरच्या शिवम पठारे, सौरभ जगताप, मोहसिन पठान यांनी चांगला खेळ केला. पुण्याच्या अनुराग कापसे व आदित्य शेळके यांनी चांगला प्रतिकार केला.

मुंबई शहर संघाने नांदेड संघावर 31-16 अशी मात करीत पहिला विजय नोंदविला. मध्यंतराला मुंबईशहर संघाकडे 16- 7 अशी आघाडी होती. मुंबई शहर संघाच्या तुषार शिंदेने चांगला खेळ केला.

परभणी संघाने ठाणे संघावर 28-23 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला परभणी संघ 9- 16 असा पिछाडीवर होता. ही पिछाडी भरून काढत परभणीने विजय मिळविला. परभणीच्या आदेश पाईकराव व प्रसाद रुद्राक्ष यांनी मध्यंतरानंतर उत्कृष्ठ चढाया करीत आपल्या संघाला विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांना अरविंद राठोडव  धनंजय माने यांची चांगली साथ मिळाली. ठाण्याच्या मंगेश सोनवणे व साईराज साळवी यांनी चांगला खेळ केला. तर आकाश पालकर व यश भोईर यांनी काही चांगल्या पकडी घेतल्या.

रत्नागिरी संगाने औरंगाबाद संघावर 35-30 अशी मात करीत आपल्या गटात विजयी सलामी दिली. मद्यंतराला रत्नागिरी संघ 15-17 असा पिछाडीवर होता. रत्नागिरीच्या श्रेयश शिंदे व वेद पाटील यांनी सुरेख खेळ केला. औरंगाबादच्या आदेश जाधव व सुनिल पांढरे यांनी चांगली लढत दिली.

मुलींच्या सामन्यात यजमान पुणे संघाने परभणी संघावर 41-27 असा दमदणीत विजय मिळवित विजयी सलामी दिली. मद्यंतराला पुणे संघाकडे 21-9 अशी आघाडी होती. पुण्याच्या समृध्दी कोळेकर हिने खोलवर चढाया केल्या. साक्षी गावडे व मनिषा राठोड यांनी पकडी घेत मैदान हलते ठेवत विजय  मिळविला. परभणीच्या सोनाली पोळे व सुमन चव्हाण सुरेख खेळ केला.
नाशिकने बीड संघावर 53-22 विजय मिळवित विजय मिळविला. मध्यंतराला नासिक संघाकडे 31- 12 अशी भक्कम आघाडी होती. नासिकच्या प्रणाली पाटील व गायत्री पठाडे यांनी उत्कृष्ट चढाया केल्या. संघमित्रा जाधव व ऐश्वर्या देवरे हिने चांगल्या पकडी घेतल्या. बीड संघाच्या कल्याणी फॅन्से हिने चांगल्या चढाया केल्या तर श्रध्दा भस्मे व प्रतिभा फॅन्से यांची चांगल्या पकडी घेतल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!