ताज्या घडामोडी
पाचुंब्री येथे जोतिर्लिंग इलेक्ट्रिकलचा विराज नाईक यांच्या हस्ते शुभारंभ.
शिराळा प्रतिनिधी / पाचुंब्री (ता. शिराळा) येथे आज गणेश सुतार या युवकाने जोतिर्लिंग इलेक्टिकल या नव्याने सुरू केलेल्या व्यवसायाचा फीत कापून सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या शुभहस्ते शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष नाईक यांचा सत्कार करण्यात आला. युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष हर्षद माने, सोसायटीचे अध्यक्ष रंगराव माने, प्रकाश सुतार, बाबुराव कुंभार, चंद्रकांत व शंकर पाटील, सोसायटीचे माजी अध्यक्ष शंकर पाटील, प्रमोद माने, राकेश सवाखंडे, नामदेव सुतार, रमेश पाटील, प्रतिक सुतार, आदीनाथ सुतार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.