ताज्या घडामोडी

मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान लाभार्थीना आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते पत्र प्रदान.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / चिखली (ता. शिराळा)येथे आज मानसिंगभाऊ लोक कल्याण अभियान अंतर्गत शासकीय योजनचा लाभ मिळवू दिलेल्या शिराळा तालुक्यातील 30 लाभार्थींना योजनेतील लाभाच्या मंजुरीचे पत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. सुरवातीस अभियानाचे मुख्य समन्वयक उदय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. योजना मंजूरी पत्रांचे वाटप सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, अभियानाचे मुख्य प्रर्वतक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. योजनावार लाभार्थी असे : इंदिरा गांधी रा. परितक्त्या वेतन योजनेतील लाभ मिळवून दिलेले लाभार्थी असे : अंजना दत्तात्रय साळुंखे व शिला बापू केसरे (दोघी रेड), आनंदी वसंत पाळेकर (शिवरवाडी), सुमन वसंत माने (पाडळी). इंदिरा गांधी रा. विधवा वेतन योजनेतील लाभ मिळवून दिलेले लाभार्थी असे : प्रियांका विक्रम पाटील (पाडळी), सुभद्रा सुरेश माने (शिवरवाडी), वर्षा हणमंत भडकमकर (बांबवडे), सुरेखा अजित सवाखंडे (पाचुंब्री), वंदना दिलीप पाटील (शिराळा), सुनंदा दिलीप घोडे (शिराळा), लता आनंदराव पाटील (बिळाशी), लक्ष्मी बाजीराव पाटील (पाचगणी), रंजना प्रविण दिंडे (माळेवाडी), सुमन सिद्धाथ् झाडे (आरळा). श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभ मिळवून दिलेले लाभार्थी असे : तुकाराम सखाराम पाटील, जयाबाई रंगराव पेठकर, शामराव येताळ सातपुते, अंजणी महादेव चव्हाण (चौघे रेड), रघुनाथ चंद्रु मस्कर व शोभा रघुनाथ मस्कर (दोघे बेलदारवाडी), मानाजी गणपती कुंभार व रुक्मिनी मानाजी कुंभार (दोघे फुपेरे), गुणाबाई पांडुरंग नांगरे (आरळा), लक्ष्मण रामचंद्र साळुंखे (शिराळा), कलावती संपत महारुगडे (शिवरवाडी). संजय गांधी अपंग योजनेचा लाभ मिळवून दिलेले लाभार्थी असे : राजवर्धन प्रशांत पाटील (खेड), सम्राट शरद जाधव (बेलदारवाडी), अदित्य महादेव पाटील (येळापूर). इंदिरा गांधी रा. अविवाहित वेतन योजनेचा लाभ मिळवून दिलेले लाभार्थी असे : संगीता धोंडीराम सवाखंडे (पाचुंब्री). तसेच अभियान समन्वयक राकेश सवाखंडे, वैभव गिरीगोसावी, शंकर बोरगे, अभिजीत यादव, अनिल पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!