ताज्या घडामोडी
बिळाशी येथे शिराळा – शाहूवाडी सुवर्णकार समाजाचा सामुदायिक मौजीबंधन सोहळा संपन्न.
शिराळा प्रतिनिधी / बिळाशी (ता. शिराळा) येथे शिराळा – शाहूवाडी तालुका सुवर्णकार समाजाचा सामुदायिक मौजी बंधन सोहळा उत्साहात संपन्न झाला. त्यास सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी सुवर्णकार समाजामार्फत जिल्हाध्यक्ष नाईक यांचा शाल व पुष्पहार देवून सत्कार झाला. ‘विश्वास’ कारखान्याचे संचालक विष्णू पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते पी. आर. पोतदार, महेंद्र पोतदार व तालुक्यातील सुवर्णकार समाजातील मंडळी उपस्थित होती.