ताज्या घडामोडी

राज्य स्पर्धेत मुंबई शहरासाठी दोन सुवर्णपदक पटकावत वींस पाटीलची दुहेरी सुवर्ण कामगिरी

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई : ऑल महाराष्ट्र राज्य कॅडेट आणि ज्युनियर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२, किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र आणि अहमदनगर किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच बंधन लॉन – अहमदनगर येथे पार पडली. सदर संस्थेचे अध्यक्ष नीलेश शेलार यांनी राज्य स्पर्धेचे आयोजन केले होते.

शितो रीयू स्पोर्ट्स कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशन संस्थेच्या विन्स पाटील याने
मुंबई शहराचे प्रतिनिधित्व करताना पॉईंट फाईट आणि लाईट कॉन्टॅक्ट या मी दोन्ही इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले. मुंबई शहरातील किक बॉक्सर खेळाडूंनी आपली चमक दाखवत २ सुवर्ण पदके, ४ रौप्य पदके व ५ कांस्य पदके अशी एकूण ११ पदके पटकावत चमकदार कामगिरी केली. तर मुलींमध्ये सराह रंगवाला व अमातुला वागल वाला या दोघींनी रौप्य तसेच आशिष महाडिक याने मुलांमध्ये रौप्य पदक पटकावले, रुकय्या नीमुचवाला हिने दुहेरी कांस्य पटकावले, मुलांमध्ये सावीर पलाये, आलोक ब्रीद, दाऊद वागलवाला यांनी कांस्यपदक पटकावत स्पर्धेवर आपली छाप पाडली. ईशा चोरगे, दर्श म्हस्कर, रियान सावंत, बराहा उद्दीन रंगवला ह्या खेळाडूनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर चे अध्यक्ष – उमेश मुरकर यांनी संघ प्रशिक्षक म्हणून व विघ्नेश मुरकर व रोहित भंडारी यांनी प्रशिक्ष म्हणून मुंबई शहरातील मुलांना मार्गदर्शन केले. गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांनी सदर खेळाडूंची स्पर्धा पूर्व तयारी करण्यासाठी आपले मोलाचे योगदान दिले होते. सदर स्पर्धेस महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांनी सहभाग नोंदवत एकूण १४६० मुले व मुलींनी उपस्थिती नोंदविली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!