ताज्या घडामोडी

माणिकवाडी सेवा सोसायटीत जयंत परिवर्तन पॅनल विजयी.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / माणिकवाडी (ता. वाळवा) येथे झालेल्या सेवा सोसायटी निवडणूकीत जयंत परिवर्तन पॅनेलने सर्व 13 जागा जिंकून विरोधी जोगेश्वरी ग्राम विकास पॅनेलचा पराभव करत दणदणीत विजय संपादन केला. आज सर्व विजयी उमेदवारांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट घेतली. आमदार मानसिंभाऊ यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सोसायटीचे माजी उपाध्यक्ष वसंत शिंदे, उपसरपंच सुभाष खोत, सावकार बापू, सचिन मदने व विवेक खोत यांच्यासह विजयी उमेदवार शंकर रामचंद्र जाधव, तानाजी शंकर मोहिते, रामराव कुडलिक बांदल, रामराव काशिनाथ शिंदे, काशिनाथ मारुती रेठरेकर, आदिक लक्ष्मण कोरे, बापू बाळू खोत, अशोक शंकर खोत, अनिल बाळकू मदने, विजया शंकर खोत, शारदा पोपट खोत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!