ताज्या घडामोडी

ओझर्डे येथील विकास महाडिक यांची सांगली जिल्हा मध्य.बँकेच्या कामगार संचालक पदी निवड

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / ओझर्डे (ता. वाळवा) येथील विकास ज्ञानू महाडीक यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामगार संचालकपदी निवड झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांची त्यांनी भेट घेतली. आमदार मानसिंगभाऊ यांनी श्री. महाडीक यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देताना म्हणाले, मिळालेल्या संधीचा फायदा कामगार बांधवांना कसा होईल असे कामकाज करावे. त्यांच्या प्रश्न, अडी-अडचणी संचालक मंडळाच्या समोर आणाव्यात. त्याची सोडवणूक करून संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांत समन्वय ठेवावा. बँकेच्या प्रगतीसाठी झटावे. यावेळी राजारामबापू दूध संघाचे संचालक बंडोपंत नांगरे, रयत बँकेचे संचालक आनंदराव पाटील, केडरचे सचिव जयवंत पाटील, उपसरपंच सुरेश सुर्यगंध, जयवंत माळी, दत्तात्रय सुतार, शिवाजी महाडीक, संभाजी पाटील, आनंदराव जाधव आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!