आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

ठराविक दुकानातून शालेय वस्तू खरेदी करण्यासाठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करा,विशाल हुलावळे..

Spread the love

ठराविक दुकानातून शालेय वस्तू खरेदी करण्यासाठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करा,विशाल हुलावळे..Action should be taken against the schools forcing to buy school supplies from certain shops, Vishal Hulawle..

आवाज न्यूज : लोणावळा, प्रतिनिधी, २४ जुन.

शालेय वस्तूंची ठराविक दुकानांतून खरेदी करण्यासाठी सक्ती करणा-या शाळांवर कारवाई करणेबाबतचे निवेदन पंचायत समिती मावळ गटशिक्षणाधिकारी वाळुंज यांना युवा सेना मावळ तालुका प्रमुख विशाल भाऊसाहेब हुलावळे यांनी केली आहे.

पंधरा जून पासून सर्व शाळा सुरु झाल्या यावेळी शाळेची नव्याने खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग सुरु झाली.यावेळी अनेक शाळांकडून पालकांना ठराविक दुकानातूनच शालेय साहित्य व गणवेश खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी पालकांकडून होत आहेत. आणि या शाळा ज्या दुकानदाराकडून साहित्य खरेदी करण्याची सक्ती करत आहेत ते दुकानदार आव्वाच्या सव्वा दरात साहित्य व गणवेशाचे दर आकारत आहेत.

पालक आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून शाळेने ज्या दुकानातून साहित्य खरेदी करण्यास सांगितले आहे त्याच दुकानातून चढ्या  दराने शालेय साहित्य खरेदी करत असून ज्या शाळा अशी सक्ती करतात त्या शाळांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी विनंती निवेदनामार्फत विशाल भाऊसाहेब हुलावळे यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांना करण्यात आली आहे.

यावेळी मावळ तालुका युवा सेनाध्यक्ष विशाल भाऊसाहेब हुलावळे,वडगांव शहर शिव सेनाप्रमुख प्रवीण ढोरे आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!