क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

तमाशाचा फड गाजवलेली महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञीचं भीषण वास्तव; शांताबाई कोपरगावकरांवर भीक मागण्याची वेळ..

लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांची बातमी महाराष्ट्र टाइम्सने लावल्याने, मिळाला निवारा.

Spread the love

तमाशाचा फड गाजवलेली महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञीचं भीषण वास्तव; शांताबाई कोपरगावकरांवर भीक मागण्याची वेळ..The horrifying reality of Maharashtra’s Lavani empress, which was a spectacle; Time to beg Shantabai Kopargaonkar..

आवाज न्यूज : पुणे वार्ताहर, २४ जुन.

जिच्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोअर, टाळ्या, शिट्या आणि दौलत जादा करत गाजलं. जिच्या अदाकारीने आणि सौंदर्यानं चाळीस वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केलं त्या लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर उर्फ शांताबाई अर्जुन लोंढे. ज्यांच्यावर आज रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आलीये, विश्वास नाही बसत ना.

पण कलावंतांचा आणि कलेची पूजा करणाऱ्या या महाराष्ट्रातलं हेच भीषण वास्तव तुम्ही आम्ही पाहतोय समोर.शांताबाई भटक्या समाजातील. लहान वयात तमाशात नृत्यकाम करू लागल्या. गायिकाही झाल्या. कोपरगाव येथील काही लोकांनी शांताबाई कोपरगावकर नावाने तमाशा काढला. शांताबाई मालक झाल्या.पन्नास-साठ लोकांचं पोट भरू लागल्या. यात्रे-जत्रेत तमाशा प्रसिद्ध झाला.बक्कळ पैसा मिळू लागला. अशिक्षित शांताबाईंची फसवणूक झाली. तमाशा सुरू करण्यासाठी मदत करणाऱ्यांनीच सर्व तमाशा विकून टाकला. शांताबाई उद्ध्वस्त झाल्या.त्यानंतर मानसिक आजारानं त्यांना ग्रासलं आणि आज शांताबाईंना दिवसभर शहरभर फिरून भीक मागून दोन वेळाची जेवणाची व्यवस्था करावी. तर हक्काचं निवारा नसल्याने रात्री झोपण्यासाठी कोपरगाव बस स्थानकात झोपत.जणू कोपरगाव बस स्थानकच शांताबाईंचे घर बनले होते.

कोपरगाव येथील एकेकाळची लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर ह्या वृद्धावस्थेत हलाखीचे जीवन जगत असल्याबाबतची बातमी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने दाखवली होती. यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत थेट कोपरगाव येथील शांताबाईंच्या भाच्याच्या घरी जात त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. तसेच कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शिर्डी येथील वृद्धाश्रमात त्यांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला. त्यांच्या भाच्याच्या घरी शांताबाईंची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी शांताबाईंनी जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहलता कोल्हे यांच्याकडे आपली व्यथा मांडत सुख दुःखाच्या गोष्टी सांगितल्या. जीवनातील विविध चढ-उताराचे प्रसंग सांगताना शांताबाईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. मात्र आपले अश्रू लपवत वृद्धावस्थेत चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्यांमधून चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवत उमेदीच्या काळात घडलेले विविध प्रसंग त्यांनी कोल्हेंकडे कथन केले.

यावेळी स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचा सत्कार करत दोन साड्या आणि खर्चासाठी काही रक्कम त्यांना देऊ केली. आस्थेने विचारपूस करत स्वतःची काळजी घेण्याबाबत अधिकार वाणीने सूचना केल्या. यावेळी स्नेहलता कोल्हे यांनी गाणे गाऊन दाखवण्याचा आग्रह धरला असता शांताबाई म्हणाल्या माझा गळा आणि आवाज आता आधीसारखा राहिला नसल्याचे सांगितले. मात्र उपस्थित सर्वांनी आग्रह धरल्याने त्यांनी पहाडी आवाजात आपल्या जुन्या गाण्यांना पुन्हा गाऊन दाखवत उपस्थितांची आणि माजी आमदार कोल्हे ताई यांची वाहवा मिळविली.

यानंतर स्नेहलता कोल्हे यांनी त्यांना शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटल येथे उपचार घेण्याबाबत सुचविले. तसेच द्वारकामाई वृद्धाश्रम येथील संचालक यांच्याशी शिर्डीतील युवा नेते सचिन तांबे यांच्या मार्फत संपर्क केला. त्यानंतर तांबे यांनीही तातडीने रुग्णवाहिका आणि इतर वाहनांची व्यवस्था करत स्वतः कोपरगाव येथे आले. शांताबाईंना शिर्डीत घेऊन येत साईबाबांचे दर्शन घडविले आणि वृद्धाश्रमात दाखल केले. पावसाळ्याचे दिवस असल्याने काही दिवस शांताबाईंची वृद्धाश्रम येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!