आपला जिल्हानिधनवार्ता

वेहेरगावातील जेष्ट महिला मुक्ताबाई मधुकर कुटे यांचे दु:खद निधन.

Spread the love

वेहेरगावातील जेष्ट महिला मुक्ताबाई मधुकर कुटे यांचे दु:खद निधन.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी , २५ जुन.

वेहेरगावातील सामाजिक कार्यकर्त्या , माजी ग्रामपंचायत सदस्या मुक्ताबाई मधुकर कुटे (वय -७३) यांचे शनिवारी ता.२४ रोजी सकाळी अल्पशः आजाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात पती , तीन मुलगे , एक मुलगी , सुना , नातवंडे , दीर ,जावा , पुतने , जावई असा परिवार आहे.
श्रीएकविरा देवस्थानचे माजी विश्वस्थ व कार्ला विकास सोसायटी चे माजी चेअरमन स्व..विलास मधुकर कुटे , युवक कार्यकर्ते तानाजी मधुकर कुटे , संतोष मधुकर कुटे हे त्यांचे सुपुञ होत. तसेच किवळेतील स्वाती विकास तरस या त्यांच्या कन्या होत.मावळ च्या माजी पंचायत समिती सभापती श्रीमती जनाबाई शंकरराव हुलावळे या त्यांच्या बहीण होत.कै.मुक्ताबाई कुटे यांनी अत्यंत कष्टातून संसार फुलवला व मुलांवर व नातवंडे यांचेवर चांगले संस्कार केले. कै.कुटे यांनी १९९० मधे ग्रामपंचायत सदस्या म्हणून गावात अनेक विकास कामे केली .

कार्लातील वाडेकर कुटूंबातील कन्या आसलेल्या कै. मुक्ताबाई कुटे यांचे अचानक निधनामुळे वेहेरगाव व कार्लासह पंचक्रोशिवर शोककळा पसरली आहे.
यावेळी वेहेरगावचे स्मशानभूमित तळ्याकाठी कै.मुक्ताबाई कुटे यांचे पार्थिवावर ता.२४ रोजी दुपारी साडेबारा वाजता शोकाकूल वातावरणात आंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे उपाध्यक्ष ह.भ.प.शांतारामबुवा गायखे , कार्लाचे उपसरपंच किरणशेठ हुलावळे , किवळे गावचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब तरस , एकविरा देवस्थान माजी विश्वस्थ मदन भोई , जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रध्दांजलीपर भाषणे केली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!