ताज्या घडामोडी

माध्यमिक शिक्षक,-शिक्षकेतर पतपेढीचे शाखाधिकारी संजय मुकादम यांचा सेवानिवृत्ती निमित्त ३१ रोजी सत्कार

Spread the love

जाकादेवी/ वार्ताहर:- रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतपेढीचे विद्यमान शाखाधिकारी संजय शशिकांत मुकादम हे ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून ३१ मे रोजी निवृत्त होत असल्याने त्यांचा माध्यमिक पतपेढीतर्फे कार्यालयीन शुभेच्छा समारंभ ३१ रोजी रोजी संपन्न होणार आहे.
संजय शशिकांत मुकादम अत्यंत मनमिळावू आणि कामात तत्पर व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत.यांनी लिपिक पदावर १० वर्ष, वरिष्ठ लिपिक पदावर १० वर्ष तर शाखाधिकारी म्हणून त्यांनी आजपर्यंत १८ वर्ष अतिशय प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यांचा मूळगाव त्यांचा रानपाट होय.माध्यमिक पतपेढीचे शाखाधिकारी संजय मुकादम यांनी पतपेढीचे कार्यालयीन काम अतिशय निष्ठेने पूर्णत्वास नेल्याबद्दल पतपेढी कार्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित गौरव करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!