ताज्या घडामोडी

सामाजिक योगदानाबद्ल रामलिंग पुराणे यांचा फुलसिंगनगर तांडा वासियांकडून विशेष सत्कार

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता.२५ (प्रतिनिधी)

फुलसिंगनगर तांडा (पाटील तांडा), ता. उमरगा येथे जाण्याकरिता कुठलाही रस्ता नव्हता. अगदी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या तांड्याला जा-ये करण्याचा मार्ग नसल्याने येथील नागरिक अनेक वर्षांपासून त्रस्त होते. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे यांच्या पुढाकाराने फुलसिंगनगर तांडा रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलन करण्यात आले होते. तांडा ते उमरगा तहसील कार्यालयापर्यंत २० किलोमीटर पायी मोर्चा काढून रेशन कार्ड आंदोलन काढण्यात आले होते. केंद्र व राज्य सरकारकडे या रस्त्यासाठी सन २०१७-२०१८ पासून सतत पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर या पाठपुराव्याला यश येऊन एक कोटी रुपये मंजुर होऊन या रस्त्याचे काम पूर्ण झाले. येथील तांडा वासीयांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळाला. त्यामुळे सोमवारी (ता.२३) रोजी फुलसिंगनगर तांडा वासियांकडून रामलिंग पुराणे यांनी दिलेल्या योगदानाबद्ल त्यांचा पूर्ण आहेर करून नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पुराणे म्हणाले की, मूलभूत सुविधा मिळविणे हा तुमचा हक्क असून जोपर्यंत तुम्हाला मुलभूत सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत तुमच्या हक्कासाठी पेठून उठणे ही तुमची जबाबदारी आहे. अन्यथा तुम्हाला तुमच्या हक्कापासून दूर रहावे लागेल, असे प्रखड मत त्यांनी यावेळी मांडले.
यावेळी दिगंबर सोनटक्के, बसवराज लोणी, फुलचंद राठोड, शिवाजी पवार, धनु जाधव, विलास पवार, दामाजी पवार, शंकर राठोड, काशिनाथ चव्हाण, गणपत राठोड, राम राठोड, गुलाब पवार, अनिल राठोड, पोलीस पाटील पप्पू पवार, संतोष राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!