ताज्या घडामोडी

मुरूमच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध

Spread the love

चेअरमन दत्ता चटगे तर व्हाईस चेअरमनपदी हैदरअल्ली मासुलदार
मुरूम, ता.२४ (बातमीदार) : येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे निवडणुकीत चेअरमन व व्हाईस चेअरमनपदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे मुरूम येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. सदर सोसायटी ही स्थापनेपासूनच काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता. २४) रोजी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी टी. एल. शहापूरकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. चेअरमन पदासाठी दत्ता चटगे व व्हाईस चेअरमन हैदरअल्ली मासुलदार या दोघांचे अर्ज दाखल झाले होते. यांच्या विरोधात अर्ज नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. शरण पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे काम चांगल्या पद्धतीने चालविले जाते. यापुढेही सर्व संचालक मंडळाच्या वतीने असेच सहकार्यातून सोसायटी चालवावी असे मत व्यक्त करून नवनियुक्त पदाधिकारी व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. यावेळी नगर शिक्षण मंडळ सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, उमरगा पंचायत समिती माजी सभापती मदन पाटील, सचिन पाटील, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, कंटेकुरचे सरपंच गोविंद पाटील, देवेंद्र कंटेकुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!