ताज्या घडामोडी

ॲड.मनीषा खंडागळे जगताप यांची E.D, C.B.I, व फौजदारी खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून केंद्रशासनाकडून फेरनियुक्ती.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / मूळच्या शिराळ्याच्या व मुंबई उच्च न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून प्रथितयश ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून काम करत असलेल्या ॲड. मनीषा खंडागळे जगताप यांची नुकतीच केंद्र सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात अंमलबजावणी संचालनालय( E.D.),केंद्रीय गुन्हे अन्वेषण (C.B.I)व केंद्र सरकारच्या फौजदारी खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती केली.
मुंबई उच्च न्यायालयात बरोबरच सुप्रीम कोर्ट,नवी दिल्ली व लंडन येथे देखील त्या व त्यांचे पती श्री शेखर जगताप हे ख्यातनाम वकील म्हणून परिचित आहेत. राजकीय सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक उच्चपदस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. शिराळा नागपंचमी व इतर अनेक राजकीय सामाजिक न्यायालयीन लढाईमध्ये ॲड. मनीषा खंडागळे जगताप यांनी विनामोबदला मोलाचे योगदान दिलेले आहे.
covid-19 मध्ये शिराळा व परिसरामध्ये कित्येक लाख रुपयाचे हजारो अन्न अत्यावश्यक अन्नधान्य व आवश्यक वस्तूचे किट वाटप करण्याबरोबरच सन 2019 च्या महापूर व नैसर्गिक आपत्ती मध्ये देखील यापूर्वी त्यांनी मोठ्या प्रमाणावर देणग्या देऊन बहुमूल्य मदत केलेली आहे.
शेतकऱ्याची मुलगी असलेल्या,शिराळा सारख्या डोंगराळ व ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेल्या ॲड. मनीषा खंडागळे जगताप या, एनजीओ च्या माध्यमातून काम करत असताना प्रसिद्धीपासून नेहमीच लांब राहिल्या आहेत. वकिली बरोबरच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय व सर्वच क्षेत्रामध्ये उज्वल कामगिरीचा ठसा उमटवून वकिली पेशा ची देखील त्यांनी मान उंचावली आहे.याबद्दल अभिमान वाटून त्यांचे बदल नेहमीच कृतज्ञता राहिली आहे
आज,शिराळा तालुका काँग्रेस कडून शिराळा येथे त्यांचे घरी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!