ताज्या घडामोडी

सांगली जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक जयवंत पाटील यांचा सेवानिवृतीनिमित्त सत्कार

Spread the love

. शिराळा प्रतिनिधी / सांगली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक जयवंत जगन्नाथ पाटील हे 31 वर्षे 8 महिने विविध पदावर सेवा बजावून काल (ता. 30) सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा निरोप व सत्कार समारंभ बँकेत पार पडला. बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी सौ. व श्री. जयवंत पाटील यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार केला. यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष, संचालक दिलीपराव पाटील, संचालक वैभवदादा शिंदे, व बी. एस. पाटील, कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ, श्री. एम. बी. रामदूर्ग, श्री. सुधिर काटे, सतीश सावंत, पी. वाय. सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!