ताज्या घडामोडी

साई इंग्लिश अकॅडमी तर्फे-जागतिक पर्यावरण दिन

Spread the love

 

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस एम पाटील
*साजरा!!! वनअधिकारी बळवंत पाटील व सरकारी अभिभोक्त्ता सौ प्रतिभा मगर होते प्रमुख पाहुणे

आज 5 जून रोजी,जागतिक
पर्यावरण दिनानिमित्त-साई इंग्लिश
अकॅडमितर्फे,जागतिक पर्यावरण
दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रम प्रमुख अतिथी म्हणून
बळवंत विठ्ठल पाटील-वनपरिक्षेत्र
अधिकारी सामाजिक वनीकरण,अमळनेर
तसेच आय.टी.चव्हाण-वनपाल सामाजिक
वनीकरण,अमळनेर तसेच सौ.प्रतिभा मगर
सरकारी अभियोक्ता,पारोळा कोर्ट हे होते.

प्रमुख अतिथी बळवंत पाटील यांनी
आपल्या भाषणात म्हटले –
पर्यावरणाच्या अनेक समस्या सध्या
जगभरात जाणवत आहेत.त्यासंदर्भात
जनमानसांत जागरूकता निर्माण व्हावी,
यासाठी दरवर्षी 5 जून रोजी जागतिक
पर्यावरण दिन साजरा केला जातो.
कोरोना काळात ओक्सिजनचे महत्व
आपल्याला समजले,झाडे हेच ओक्सिजन
प्राणवायूचे प्रमुख स्त्रोत आहेत…म्हणूनच
जास्तीत जास्त झाडे आपण लावली
पाहिजेत,ती जगवली पाहिजे.
ह्या प्रसंगी साई इंग्लिश Dragon
च्या विद्यार्थ्यांना रोपे वाटण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मनोगतात
सांगितले-आम्हाला मिळालेली
रोपे आम्ही आजच आमच्या घराच्या
बागेत,परिसरात,शेतात व इतरत्र लावू.
रोपाची काळजी घेऊन,संगोपन करून
रोपांचा वाढदिवस साजरा करू.
कार्यक्रम प्रास्ताविक व सूत्रसंचालन
साई इंग्लिश अकॅडमि संचालक-
भैय्यासाहेब मगर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!