ताज्या घडामोडी

शिंदेवाडी ता.पन्हाळा जि.कोल्हापूर या ठिकाणच्या बिरोबा मंदिर परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

Spread the love

 रविवार दिनांक ५/६/२२ रोजी सातवे पैकी शिंदेवाडी ता.पन्हाळा जि.कोल्हापूर या ठिकाणच्या बिरोबा मंदिर परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमात मोलाचं सहकार्य करणारे कोडोली येथील “सेव्ह नेचर कम्युनिटी”या गृपच्या नवतरूण कार्यकर्त्यांनी वृक्षारोपणकरीता रोपे सह या तरूणांनी स्वतः खड्डे काढून वृक्षारोपण केले.

त्यांना सहकार्य बिरदेव तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिंदेवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई या मंडळाचे अध्यक्ष श्री. महादेवराव भिंगार्डे हे उपस्थित होते.
सेव्ह नेचर कम्युनिटीचे दिग्विजय पाटील/अनिरुद्ध काईंगडे/गिरीश गाताडे/प्रणव गाताडे/शांतनू कागळे/ मल्हार माने/यशराज डोईजड/समर्थ पाटील/अनुज जाधव/आषिश कापरे /श्रीकांत निकम /जयदीप पाटील/हर्षवर्धन पाटील या सर्वांनी सहभाग घेतला.सोबत बिरदेव तरुण मंडळांचे श्री.राजाराम शिणगारे/प्रकाश शिणगारे/महादेव शिणगारे/दत्तात्रय शिणगारे/अभिषेक शिणगारे/बाजिराव शिणगारे व जगन्नाथ शिणगारे यांचेही सहकार्य लाभले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!