ताज्या घडामोडी

डॉ.महादेव वळंजू यांना जीवगौरव पुरस्कार प्रदान

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

मुंबई :- जोगेश्वरी पूर्व येथील डॉ महादेव दत्तात्रय वळंजू यांना नुकताच जॉय सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार दादर येथील आरजू सभागृहात प्रमुख पाहुणे बाबूभाई भवानजी माजी उपमहापौर मुंबई, प्रा डॉ राम नेमाडे ज्येष्ठ साहित्यिक, जनार्दन जंगले शिक्षक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.यावेळी डॉ वळंजू यांच्यासोबत त्यांचे अनेक नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होता.जोगेश्वरी येथे ५० वर्षाहून अधिक काळ डॉ यांनी गोरगरीब वंचित यांना खूप अल्पदरात व नाममात्र एक रुपया घेऊन आणि अनेक वेळा मोफत उपचार केलेले आहेत.ते स्वतः अधक्ष्य असलेल्या श्री समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्येआजही अनेक विद्यार्थी शिकत आहेत.जीवनगौरव मिळाल्याबद्दल जोगेश्वरीतील नागरिकांनी व डॉ वळंजू यांच्याशी जुडलेल्या अनेकांनी आनंद व्यक्त केल्याचे जॉय चे संस्थापक गणेश हिरवे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!