ताज्या घडामोडी

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चीफ केमिस्ट सुनील सावंत यांना पुणे (मांजरी बु:) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) च्या वतीने ‘बेस्ट चीफ केमिस्ट’या पुरस्काराने सन्मानित

Spread the love

इस्लामपूर दि.८ प्रतिनिधी
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चीफ केमिस्ट सुनील सावंत यांना पुणे (मांजरी बु:) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) च्या वतीने ‘बेस्ट चीफ केमिस्ट’या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील शानदार सोहळ्यात राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते श्री.सुनील सावंत,सौ. अपर्णा सावंत यांनी हा पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्र पवार, राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे,सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम प्रामुख्याने उपस्थित होते.
सुनील सावंत हे शांत,सयंमी व शिस्तप्रिय चीफ केमिस्ट आहेत. त्यांनी स्वकर्तृत्वावर हा पुरस्कार मिळविला आहे. त्यांच्या पुरस्काराने आमच्या कारखान्याच्या नांवलौकिकात भरच पडली आहे,अशी प्रतिक्रिया राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर.पाटील,उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी दिली.
सुनील सावंत म्हणाले, राज्याचे जल संपदामंत्री ना.जयंतराव पाटील,कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील,उपाध्यक्ष विजयराव पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांचे मार्गदर्शन,तसेच माझे आई-वडील व सर्व कुटुंबिय आणि सहकाऱ्यांच्या साथीने मी जे काही काम करू शकलो,त्यातून मला आमच्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. उर्वरित सेवेत ही संस्थेला प्रामाणिक सेवा देत राहीन. रोख रक्कम,सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ते गेल्या १८ वर्षांपासून चीफ केमिस्ट म्हणून जबाबदारी पहात आहेत. त्यांना नुकतीच जनरल मॅनेंजर (प्रोसेस) पदी बढती मिळाली आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक विराज शिंदे,दिलीपराव पाटील,श्रेणीक कबाडे, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली जनरल मॅनेंजर एस.डी.कोरडे,तसेच डॉ.सुशील सावंत,कु.सौरभ सावंत,सौ.भाग्यश्री सावंत- जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.पुणे येथील व्हीएसआयच्या वतीने ना.दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते बेस्ट चीफ केमिस्ट पुरस्कार स्विकारताना चीफ केमिस्ट सुनील सावंत, सौ.अपर्णा सावंत. व्यासपीठावर खा.शरदचंद्र पवार,ना. बाळासाहेब पाटील,ना.राजेश टोपे,अध्यक्ष पी.आर.पाटील,उपाध्यक्ष विजयराव पाटील, तसेच संचालक व कुटुंबिय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!