क्रीडा व मनोरंजन

एन एससीआय अखिल भारतीय स्नूकर स्पर्धा १५ जूनपासून ६ लाख ४० हजार रुपयांची बक्षिसे

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

मुंबई ( प्रतिनिधी):
नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) आयोजित एनएससीआय अखिल भारतीय स्नूकर खुली स्पर्धा १५ जूनपासून एनएससीआयच्या बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळली जाणार आहे. २ जुलैपर्यंत चालणार्‍या स्पर्धेत ६ लाख ४० हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
एनएससीआय ओपन ही देशातील सर्वात जास्त बक्षीस असलेली स्पर्धा आहे. यंदा विजेत्या खेळाडूला दोन लाख तसेच उपविजेत्याला एक लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. पात्रता (नॉकआउट) आणि मुख्य फेरी अशा दोन गटांमध्ये खेळल्या जाणार्‍या स्पर्धेत ३२ अव्वल स्नूकरपटू सहभागी होतील. त्यात राष्ट्रीय क्रमवारीतील टॉप आठ खेळाडूंचा समावेश असेल. क्‍वॉलिफाइंग राउंड १५ ते २६ जून २०२२ या कालावधीत होतील. मुख्य फेरीला २७ जूनपासून सुरुवात होईल.
पात्रता फेरीतून १६ क्‍वॉलिफायर्स मुख्य फेरीत प्रवेश करतील. एकूण ३२ खेळाडूंना आठ ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातील चार खेळाडू राउंड-रॉबिन पद‍्धतीने एकमेकांशी खेळतील. प्रत्येक ग्रुपमधून प्रत्येकी दोन खेळाडू उपांत्यपूर्व फेरीसाठी (अंतिम १६) पात्र ठरतील. उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरी ३० जूनला होईल. सेमीफायनलचे सामने १ जुलैला रंगतील. महाअंतिम सामना २ जुलै रोजी होईल.
विजेता (२ लाख रुपये) आणि उपविजेत्यासह (१ लाख रुपये) उपांत्य फेरीतील पराभूत खेळाडूंना प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!