आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आकाश शिंदे यांचा नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीतर्फे सत्कार.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून "सहाय्यक प्रकल्प अधिकारी " म्हणून निवड झालेले आकाश दिलीप शिंदे यांचा सत्कार नूतन परिवारातर्फे करण्यात आला.

Spread the love

आकाश शिंदे यांचा नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीतर्फे सत्कार

आवाज न्यूज: नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे, नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरींग या विभागातून उत्तीर्ण झालेले आणि नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून “सहाय्यक प्रकल्प अधिकारी ” म्हणून निवड झालेले आकाश दिलीप शिंदे यांचा सत्कार नूतन परिवारातर्फे करण्यात आला.

‘ सत्काराला उत्तर देताना अथक परिश्रमाचे फळ मला मिळाले, या यशात महाविद्यालयाचे सहकार्य मौल्यवान आहे,’ असे बोलताना त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच मावळ भागातील स्पर्धा परीक्षेंची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमी तत्पर राहील असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी संस्थचे खजिनदार राजेश म्हस्के यांनी आकाशचे हे यश आमच्या संस्थेसाठी अभिमानाची बाब असून त्याच्या भावी वाटचालीस शुभेछया व्यक्त केल्या. संस्थचे अध्यक्ष संजय ( बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आकाशचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, सर्व विभागप्रमुख आणि शिक्षक शिक्षकेतर वर्ग उपस्थित होता. प्रा. नीता कराडकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!