आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण संतुलन राखा- 

एखादे झाड असेही लावावे की त्याची सावली शेजाऱ्याच्या घरी जाईल!डॉक्टर शाळीग्राम भंडारी.   

Spread the love
  1.    आवाज न्यूज:झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण संतुलन राखा-                                                                       तळेगाव दाभाडे: प्रत्येक माणसाला हवे असते– *आपल्याला हसतमुख आयुष्य हवे आहे! जीवनाच्या प्रत्येक वळणावर नवीन कथा हवी आहे! त्यासाठी त्या परमेश्वरी कृपेची गरज आहे! वरील आमचे स्वप्न प्रत्यक्ष सत्यात उतरले तो दिवस होता, “मंगळवार 7 जून 2022”– आम्ही दरवर्षी पावसाळ्यात झाडे लावतो! पण आमची विचारसरणी अशी आहे – *एखादे झाड असेही लावावे की त्याची सावली शेजाऱ्याच्या घरी जाईल! हे स्वप्न प्रत्यक्ष साकार होण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील उद्यान संस्थेच्या प्रांगणात आम्ही मोठ्या मेहनतीने सुमारे पन्नास रोपांची लागवड केली! या फलोत्पादन संस्थेचे संचालक “डॉ.भास्कर पाटील”व प्रकल्प अधिकारी  संजयजी पारडे, यांचे विशेष योगदान लाभले! तळेगाव नगर परिषद अधिकारी  सरनाईक व महाजन यांनी आम्हाला सर्व रोपेउपलब्ध करून दिलीत! मित्रांनो, तुम्ही विचाराल की, आपण झाडे का लावतो? या प्रश्नाचे उत्तर अगदी साधे आणि सोपे आहे, सर्वप्रथम झाडे आपल्या पर्यावरणाचा समतोल राखतात, त्यांच्याद्वारे आपल्याला पूर्ण फळे मिळतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात फुले आणि फळे खूप महत्वाची असतात, कोरोना एकोणीस व्हायरसने ग्रासल्यानंतर जवळ जवळ दोन वर्षात जीव वाचवण्यासाठी आम्ही ऑक्सिजनसाठी दारोदार भटकलो, ही झाडे आम्हाला मोफत ऑक्सिजन देतात! प्रत्येक माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक झाडापासून आवश्यक लाकूड आपल्याला उपलब्ध असत! याशिवाय प्रत्येक झाडात औषधी गुणधर्म आहेत! आपल्या अनेक रोगांवर या झाडांमुळे उपचार केले जातात. या सर्व बाबींचा विचार करून हा वृक्षारोपणाचा उपक्रम दरवर्षी अनेक संस्थांकडून ठिकठिकाणी सुरू आहे! प्रजापिता ब्रह्माकुमारी तळेगावचे केंद्रप्रमुख आदरणीय “प्रभादीदी व मीना दिडिके, यांच्यासह लायन्स क्लब तळेगावचे अध्यक्ष ला.दीपक बाळसराफ – नवनिर्वाचित अध्यक्ष लायन.मयूर राजगुरुव व समन्वय अधिकारी लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी यांचे विशेष सहकार्य लाभले. या आनंदी-पवित्रात सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले! उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करताना पर्यावरण समतोलाचे महत्वही विशद करण्यात आले! आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!