ताज्या घडामोडी

चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापनदिन साजरा.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

चिखली (ता. शिराळा) येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने विश्वास कारखाना कार्यस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, तालुका व गाव पातळीवरील नेते मंडळी आदींना तालुकाध्यक्ष नलवडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य रणधीर नाईक, सूतगिरणीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण, तालुक्याचे उपसभापती बी. के. नायकवडी, विश्वासचे संचालक यशवंत निकम, संदीप तडाखे, महिला तालुकाध्यक्ष साधना पाटील, शिराळा नगराध्यक्ष प्रतिभा पवार, उपनगराध्यक्ष विजय दळवी, माजी जि. प. सदस्य महादेव कदम व प्रवीण शेटे, सुनील कवठेकर, अर्चना कदम, युवक तालुकाध्यक्ष हर्षद माने, नगरसेवक संजय हिरवडेकर, मोहन जिरंगे, बंडा डांगे, सुनंदा सोनटक्के, सुनीता निकम, डॉ. मीनाक्षी पाटील, मीनाताई बेंद्रे, प्रथमेश शिंदे, अमित गायकवाड, उत्तम निकम, विजय महाडिक, विलास झोळे, वंदना यादव, वैशाली कदम, रुपाली कदम, महेश शेडगे, डॉ. शैलेश माने, सुधीर पाटील, सचिन पाटील, उदय पाटील, गजानन पाटील तसेच जिल्हा प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान शिराळा येथील विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा 23 वा वर्धापन दिन व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून मा. विराज नाईक यांच्या निवडीची वर्षपूर्ती केक कापून उत्साहात साजरा केला. तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, उपसभापती बी. के. नायकवडी, युवक तालुकाध्यक्ष हर्षद माने, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष उदय पाटील, प्रमोद पवार, विनोद निकम, शहर अध्यक्ष अमित गायकवाड, सरव्यवस्थापक युवराज गायकवाड, रवींद्र पाटील, पंडित निकम, वसीम मोमीन व युवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!