ताज्या घडामोडी

मांगरुळातून उच्च पदस्थ अधिकारी बनतायत : कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

Spread the love

कोकरुड/प्रतापराव शिंदे

शिराळा तालुक्यातील मांगरुळ सारख्या ग्रामीण भागातून नालंदा अभ्यास केंद्रातून उच्च पदस्थ अधिकारी तयार होतायत. हि बाब शिराळा तालुक्याचा लौकिक वाढविणारा अशीच असल्याची मत शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी मांडले

मांगरूळ (ता. शिराळा) : येथील नालंदा अभ्यास केंद्रात नागरी सत्कार व ज्ञानशांती अभ्यासिका उदघाटन समारंभ पार पडला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक, शिवाजी विद्यापीठाचे वित्त अधिकारी अजित चौगुले, पोलिस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे, सिंधुदुर्गचे उप विभागीय पोलीस अधिकारी दीपक कांबळे, संग्राम पाटील, कोकरूडचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, कृष्णा शिंदे, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट, नामदेव शेणवी, विश्वास शिंदे, जे. डी. खांडेकर, मारुती खांडेकर, विजय खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपशिक्षणाधिकारी पदी निवड झालेल्या अभिजीत कुंभार, इन्फोसिस प्लेसल्मेट पदी निवड झालेले रोहित शिंदे, ठाणे पोलीस पदी निवड झालेले अक्षय मस्के यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. शिराळा तालुक्याचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परिट, पोलीस उप अधिक्षक कृष्णात पिंगळे, सिंधुदुर्गचे उप विभागीय पोलीस अधिकारी दीपक कांबळे, उपशिक्षणाधिकारी अभिजीत कुंभार यांनी मनोगत व्यक्त केली. सुरुवातीला कार्यक्रमाचे स्वागत, पाहुण्यांची ओळख योगेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक हिंम्मतराव नायकवडी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!