ताज्या घडामोडी

भारतीय टपाल विभागातर्फे प्रा. अरुण घोडके यांचा सन्मान

Spread the love

शिव चरित्राचा प्रचार व प्रसारांबद्दल टपाल तिकीट प्रकाशित

विलासराव कोळेकर यांजकडून

येथील शंभूशाहिर व इतिहास संशोधक प्रा. अरूण घोडके यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सलग साडे सात वर्षे लाखो नागरिकांच्यापर्यंत युट्युब, फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातुन सुरू केलेल्या “शिवचिंतन” या अभिनव व प्रेरणादायी उपक्रमाची दखल घेऊन भारतीय टपाल विभागाने त्यांच्या फोटोचा नावासह उल्लेख करून टपाल तिकीट प्रकाशित करून सन्मान केला.

ते कासेगाव  शिक्षण संस्थेच्या आझाद विद्यालयाच्या ज्युनियर विभागात शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. प्रा. अरूण घोडके यांनी असे होते शंभुराजे या विषयाच्या माध्यमातुन देश आणि राज्याच्या कानाकोपन्यात सुमारे पाच हजारहुन अधिक व्यासपिठाद्वारे शिवचरित्र, शंभूचरित्र आणि होळकरशाहीचा इतिहास सांगीतला आहे. गडकोट मोहिमा, दुर्गभ्रमंती आणि इतिहास संशोधन यामध्ये ते सलग ३० वर्ष कार्य करीत आहेत. इतिहास संधोधन, सामाजिक व शैक्षणिक संस्था आणि अनेक युवकांच्या आग्रहास्तव दि. २८ ऑक्टोंबर २०१४ पासुन ते आज अखेर प्रा. घोडके यांचा शिवचिंतन हा उपक्रम सुरू आहे. ते ध्वनीफितीद्वारे युट्युब, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातुन ६६८ ग्रुपवरील सर्व सदस्यांना दररोज अखंडपणे साडेसात वर्ष शिवसंदेश पाठवतात. प्रा. घोडके यांनी इतिहास संशोधन आणि शिवचरित्राचा प्रचार, प्रसार केल्याबद्दल अनेक संस्थांनी यापूर्वी ६०० हुन अधिक विविध पुरस्कार दिले असून विशेषतः ठाणे येथे पालकमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते त्यांना “पश्चिम महाराष्ट्र भूषण” या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

प्रा. अरूण घोडके यांनी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोवा, केरळ व पॉन्डेचेरी या राज्यांतील विविध भागाबरोबर बँकॉक, मलेशिया, दुबई, शारजाह, अबुधावी या परदेशातही व्याख्याने दिली आहेत. प्रा. घोडके यांनी शंभूचरित्र आणि शिवचरित्राचा गाढा अभ्यास करून महाराष्ट्रातील २८८ किल्ल्यांना अभ्यास भेटी दिल्या आहेत. युवक आणि समाजात व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन, निर्भिडता व प्रबोधन व्हावे यासाठी अखंडपणे सलग साडेसात वर्षे प्रा. घोडके यांनी शिवचिंतन हा उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या कार्याची भारत सरकारच्या टपाल विभागाने दखल घेऊन त्यांचे टपाल तिकीट फोटोसह प्रसिध्द केले. य़ाबद्दल प्रा. घोडके यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!