ताज्या घडामोडी

अहिल्या कन्ये ची गरुड झेप कुमारी. दर्शना राजू आखाडे पेण तालुक्यांत अवल..

Spread the love

प्रतिनिधी – महेश बबन झोरे

पेण तालुक्यातील मीरा डोंगर भागातील देऊळवाडी या गावात धनगर वाडी वस्तीत जन्मलेली कुमारी दर्शना राजू आखाडे ही वस्ती शाळेत व वेताळ पट्टी देऊळवाडी या शाळेत शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या कुमारी दर्शना राजू आखाडे या विद्यार्थिनीने एस.एस.सी. २०२२ मध्ये ९२.४०% गुण मिळवून शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेची कामगीरी केली. पेण तालुक्यात असणारे शाळा सार्वजनिक विद्यामंदिर व जूनियर कॉलेज यामध्ये प्रथम क्रमांकाने येऊन तालुक्यात बाजी मारली. अत्यंत डोंगराळ भागात असणाऱ्या पेण तालुक्यातील महाल मिर्‍या डोंगर भागातील देऊळवाडी या गावात धनगर वस्ती जन्मलेली कुमारी . दर्शना राजु आखाडे प्राथमिक शिक्षण रा. जि. प. शाळा तरणखोप व माध्यमिक शिक्षण सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज पेण या विद्यालयात झाले. महाल मीरा डोंगर देऊळवाडी हा भाग अत्यंत डोंगराळ असून सोयी-सुविधांचा अभाव नसताना सर्व परिस्थितीवर मात करून कुमारी दर्शना राजू आखाडे हिने एस. एस. सी. मध्ये ९२.४०% गुण मिळवून शाळेत प्रथम येऊन गावाचे व समाजाचे नाव रोशन केल्यामुळे सर्व समाज बांधवांकडुन तिच्यावर शुभेच्छा वर्षा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!