आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आकुर्डी येथील खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्टच्या सभागृहात रक्तदान शिबीराचे आयोजन.

Spread the love

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आकुर्डी येथील खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्टच्या सभागृहात रक्तदान शिबीराचे आयोजन, माजी विधी समिती सभापती तथा पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष काळूराम पवार यांचा रक्तदान शिबिर मध्ये सक्रिय

आवाज न्यूज: पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आकुर्डी येथील खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्टच्या सभागृहात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधी समिती सभापती आणि पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष काळूराम पवार यांनी देखील रक्तदान शिबिर मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळीराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधी समिती सभापती आणि पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष काळूराम पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात होणारी २०२२ महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. शहराला उप मुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचनेनुसार रोज पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

आणि पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,महिला अध्यक्षा कविता आल्हाट,आणि युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्या साठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, माजी नगरसेवक विनायक रणसुभे,युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष विशाल वाकडकर,पदवीधर संघाचे अध्यक्ष माधव पाटील आणि आनंद नगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!