ताज्या घडामोडी

विश्वासराव नाईक साखर कारखाना येथे रक्तदान शिबिर संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यावर आज झालेल्या रक्तदान शिबिररात शंभरावर रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिराळा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व विश्वासराव नाईक कारखान्याचे अध्यक्ष मा. मानसिंगराव नाईक यांच्या उद्या (ता. 26 जून) रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या औचित्याने शिबिराचे नियोजन कारखान्यावरील चिंतन मंडपात केले होते. त्याचे उद्‌घाटन कारखान्याचे संचालक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण रक्तपेढीमार्फत रक्त संकलीत करण्यात आले. रक्तसंकलानाचे काम डॉ. विकास मोहिते व त्याचे सहकारी धनश्री जाधव, विश्वजीत सांळुखे, वृशाली नरुटे, अंकता पवार, स्वप्नील पवार, सचिन गावडे यांनी पहिले. कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी रक्तदानात उर्त्फूद सहभाग नोंदवला. शिबिराच्या उद्‌घाटन प्रसंगी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक दीपक पाटील, सचिव सचिन पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!