ताज्या घडामोडी

जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेली यांच्या वतीने जागतिक योग दिनाच्या निमित्ताने 21 ठिकाणी मोफत योग शिबिराचे आयोजण.

Spread the love

जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेली यांच्या वतीने जागतिक योग दिनाच्या निमित्ताने 21 ठिकाणी मोफत योग शिबिरे आयोजित…13जून ते 21जून सलग 9 दिवस ..
योग विद्या गुरुकुल नाशिक अंतर्गत योग विद्या धाम पेठ व जायन्ट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेली यांच्या वतीने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इस्लामपूर शहरात विविध ठिकाणी जसे सिद्धनाथ हॉल एसटी स्टँड जवळ, सेंटर पॉइंट इस्लामपूर ,मुक्तांगण प्ले स्कूल इस्लामपूर ,पंचवटी पटेल हॉल कामेरी रोड ,जाधव हॉल लाल चौक, आत्मशक्ती हॉल किसन नगर, सद्गुरु हॉल उरूण इस्लामपूर कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे योग संजीवन वर्ग दिनांक 13 ते 21 जून रोजी मोफत सर्वांसाठी आयोजित केले होते…
संजीवन वर्गाला नागरिकांनचा चांगला प्रतिसाद मिळाला…व समारोपाला सर्वानी स्वःताला आलेली अनुभूती सांगितली…

समारोप समारंभाला साधकांना प्रमाणपत्र जायंटस् ग्रुप ऑफ इ पूर सहेली च्या नूतन अध्यक्षा सौ.चारुशिला फल्ले संस्थापक अध्यक्ष प्रतिभा शहा मा.अध्यक्षा संगीता शहा,श्रध्दा कुलकर्णी, सेक्रेटरी प्रिया बोंगाळे सदस्य निर्मला देवीडिगा,उज्वला डुबल यांच्या हस्ते देण्यात आले त्याचबरोबर योग शिक्षक पुष्पलता खरात, राधिका कुलकर्णी, पल्लवी कोरे स्नेहा हक्के आशा पाटील ईश्वरी खोत ऐश्वर्या जगताप डॉ. नीलम चव्हाण ,डॉ. श्रेया शिंदे ऋषिकेश पाटील स्वप्निल टिबे यांना वही देऊन सन्मानित करण्यात आले..व सर्व योग वर्गांना भेटी देऊन पुढील प्रवेश वर्ग जॉइन करणयिचे आवाहन जायंटस् ग्रुप ऑफ इ पूर सहेली च्या करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!