ताज्या घडामोडी

आठघराणे बलेकर वाडीत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला गोकुळाष्टमी सण

Spread the love

कांबळे लावगण येथील आठघराणे बलेकरवाडी येथे श्री. तुकाराम बलेकर यांच्या निवासस्थानी घरगुती गोकुळाष्टमी सण प्रतीवर्षा प्रमाणे साजरा करण्यात आला.

यावेळी सर्व वाडीतील बाळगोपाळांचा जाकडी नाच आयोजित करून नवोदित युवा गायक कु. मकरंद बलेकर आणि कु. अवधूत बलेकर यांच्या सुमधुर गायनाची मेजवानी पाहायला मिळाली. तसेच महालक्ष्मी महिला मंडळ आठघराणे बलेकरवाडी महिलांचा पारंपरिक नाच सादर झाला.

रात्री बारा वाजता कृष्ण जन्म उत्सव साजरा करुन सर्व महिलांनी मिळुन पाळणा गीत व पुरषांनी भजन गायले. नंतर आठघराणेचा राजा बाळगोपाळ गोविंदाने घरगुती दहीहंडी फोडली अशा नयनरम्य सोहळ्यासाठी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाटत उपतालुका अध्यक्ष श्री. किरणदादा बेकर आणि उपविभाग अध्यक्ष श्री. किशोर कुलये तसेच वाडीगावकर अरुण बलेकर, दिपक बलेकर, सल्लागार श्री. तुकाराम बलेकर, श्री. मोहन बलेकर, संदिप बलेकर, मंगेश बलेकर, सचिन बलेकर, महिला अध्यक्ष सौ. उर्मिला बलेकर, सर्व बलेकर परीवार उपस्थित होते.मनात एकीची भावना आणि सर्व जण एकत्र राहुन असे सण साजरे करण्यामागचा मानस श्री. तुकाराम बलेकर यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!