ताज्या घडामोडी

आधार संस्था व अंमळनेर मानवी हक्क व संरक्षक समिती मार्फत वेश्या व्यवसायिक महिलांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे प्रबोधन सत्राचे आयोजन

Spread the love

ईगल न्यूज़ अमळनेर प्रतिनिधि एस एम पाटील

अमळनेर : नुकताच सेक्सवर्कर लेंगिक कामगारांच्या हक्कांबाबत भारताच्या मा.सर्वोच्च न्यायालयाने निर्देश जारी केले आहेत त्याविषयी अमळनेर येथील वेश्या व्यवसायिक महिलांसाठी आधार संस्था व मानवी हक्क व संरक्षण समितीच्या वतीने प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले. सत्राच्या सुरुवातीला संस्थेकडून व महिलांकडून अंमळनेर मानवी हक्क समितीचे अध्यक्ष श्री.रवींद्र मोरे,उपाध्यक्ष श्री बन्सीलाल भागवत, सचिव श्री. संदीप घोरपडे, प्रसिद्धी प्रमुख श्री. शिवाजी मोहन पाटील, प्रसिद्धी प्रमुख श्री.मनोज शिंगणे
यांचे स्वागत करण्यात आले. आधार संस्था अध्यक्ष डॉ. भारती पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या लढाईचा हा विजय असून 18 वर्षावरील ज्या महिला स्वेच्छेने हा व्यवसाय करू इच्छितात त्याकरता सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा खूप मोठा दिलासा आहे. या महिला आता अधिक सन्माननीय जीवन जगू शकतील असे सांगितले. समितीचे सचिव श्री. संदीप घोरपडे सर यांनी पौराणिक दाखला देत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सविस्तर चर्चा केली व महिलांनी कायद्याची आपल्या हक्काची माहिती करून घेत न घाबरता परिस्थितीचा सामना करावा असे सांगितले समितीचे उपाध्यक्ष श्री. बन्सीलाल भागवत यांनी मुलांच्या शिक्षणा विषयी माहिती दिली. श्री. एस एम पाटील व श्री .मनोज शिंगणे यांनी महिलांशी चर्चा करून व्यवसाय सोडणारी महिलासाठी त्याचे पुनर्वसन करुन,त्यांना त्यांच्या पसंतीचा उद्योग सुरु करण्याबाबत माहिती दिली त्यां च्या अडीअडचणी समजून घेतल्या अंमळनेर मानवी हक्क समितीचे अध्यक्ष श्री रवी मोरे यांनी तुमच्या मानवी हक्काबाबत काहीही प्रश्न उपस्थित झाला तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले. आधार संस्थेच्या अश्विनी भदाने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला आधार संस्थेचे मयूर गायकवाड, कल्पना सूर्यवंशी, यास्मिन शेख, तोसिफ शेख, रंजू जैन नंदिनी चौधरी, फरीदा काजी, अनिता बडगुजर, आराज सय्यद यांचे अनमोल सहकार्य लाभले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!