ताज्या घडामोडी

आमोदिनी फाउंडेशन पुणे आणि इनरव्हिल क्लब ऑफ हिल टाउन फौंडा -गोवा यांच्या एकत्रित प्रयत्नातुन फोंडा येथे ” चाळीशी समज गैरसमज आणि स्त्रिया ” या विषयावर समुपदेशक

Spread the love

आमोदिनी फाउंडेशन पुणे आणि इनरव्हिल क्लब ऑफ हिल टाउन फौंडा -गोवा यांच्या एकत्रित प्रयत्नातून दिनांक २७ / ६ / २२ रोजी विश्व हिंदू परिषद हॉल फोंडा येथे अवेअरनेस प्रोग्राम अंतर्गत ” चाळीशी समज गैरसमज आणि स्त्रिया ” या विषयावर समुपदेशक व सायकोथेरपीस्ट ऍड . अनिशा फणसळकर -अध्यक्षा ” आमोदिनी फौंडेशन ” यांचे व्याख्यान आयोजित केले होते .
सदरील कार्यक्रम इंनेर व्हील क्लब आणि आमोदिनी यांनी एकत्रितपणे सादर केला . सदर कार्यक्रमास मातृशक्ती गोवा प्रांत प्रमुख सौ प्रतिभा मराठे तसेच इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सौ वंदना पवार सौ . सुहासिनी जोशी तसेच क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते . कार्यक्रमास स्त्रियांनी उत्तम प्रतिसाद दिला .
यापुढेही एकत्रीत प्रयत्नांतून अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे दोन्ही संस्थांनी नमूद केले .सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ सुहासिनी जोशी ह्यांनी केले आभार सौ प्रतिभा मराठे ह्यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!