ताज्या घडामोडी

सैतवडे रत्नागिरी एस् टी बसला अपघात

Spread the love

वार्ताहर – २७ /६ २२ रोजीची सकाळी ७ वाजता सुटणारी लालपरी रत्नागिरी कळझोंडी मार्गे व्हाया पन्हळी सैतवडे अशी लालपरी आहे . या लालपरीचा शाळेतील मुलांना चांगला फायदा होत आहे. काल या लालपरी अपघात झाला सर्व प्रवासी सुखरूप होते . नेहमी प्रमाणे मार्गस्थ होवून सैतवडे वरुन ९.१५ वाजता सुटली व खंडाळा पोलिस चौकीच्या जवळच पाईप लाईन च्या चरीत साईट घेताना गाडी चरीत गेली ,कातळ भाग असल्याने भाग आरला नाही . खंडाळा ते गुरव स्टाँप पर्यंत पाण्याच्या पाईप लाईनचे काम करण्यात आले हे काम करताना काही ठिकाणी रस्त्याच्या साईट पट्टीवर चरी मारुन ठेकेदाराने काम केले .काही लोकांनी विरोध केला चौकशी केली असता पाटील ठेकेदार यांनी सांगितले कि संबंधीत खात्याच्या परवांगीने काम करत आहोत . खरोखरच या कामाला संबंधीत खात्याची परवांगी होती का हे सुद्धा महत्त्वाचे आहे.आत्ताच पावसाळा सुरु झाला आहे.सर्वच वाहान चालकाना कसरत कारावी लागत आहे.रिक्षा बाईक व चार चाकी वाहन वाले जीव मुठीत घेऊन आपआपली वाहने चालवीत होते . आज खंडाळा ते सैतवडे हा रस्ता धोकादायक ठरत आहे .पावसाळ्यात साईट घेणे किंवा व्होवरटेक करणे धोक्याचे बनले आहे. रस्त्याची चालन झाली आहे. ५ वर्षे संपली पण सैतवडे खंडाळा रस्ता चांगला झाला नाही . जीवन प्रादेशिक नळपाणी योजनेचा काम हे कोणाला विश्वासात घेऊन केला हे महत्त्वाचे आहे. जूनी लाईन व नवीन लाईन या मध्ये सुद्धा खुपच अंतर आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!