ताज्या घडामोडी

माणुसकीच्या जगात अमळनेर रोटरी क्लब व आधार संस्था यांच्या विद्यमाणे एच.आय.व्ही. सह जगणाऱ्या अनाथ मुलांना प्रोटीन टिन वाटप करून,खरी देवाची पूजा करत आहेत – पी.आय.जयपाल हिरे

Spread the love

ईगल न्यूज़ अमळनेर प्रतिनिधि एस एम पाटील 

दि.27-06-2022 वार सोमवार रोजी सकाळी १०:३० रोटरी क्लब, अमळनेर व आधार बहुद्देशीय संस्थे संयुक्त विद्यमाने एच.आय.व्ही. सह जगणाऱ्या अनाथ मुलांना प्रोटीन टिन, शालेय वह्या, पुस्तक व पेन साहित्य रोटरी हॉल येथे प्रदान करण्यात आले, त्याच बरोबर रो. विशाल शर्मा यांच्या कडून टिफिन, वॉटर बॉटल आणि पॅड प्रदान करण्यात आले, मागील २ वर्षांपासून अमळनेर येथील एच आय व्ही सोबत जगणाऱ्या अनाथ मुलांनसाठी आधार बहुद्देशीय संस्थे सोबत रोटरी क्लब काम करत आहेत,
या मुलांना व त्यांच्या परिवाराला खुप धिर देण्याचे काम रोटरी क्लब करत आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थान अमळनेर पोलीस निरीक्षक श्री.जयपाल हिरे साहेब व रोटरी क्लब चे मावळते अध्यक्ष रो. वृषभ पारेख व सचिव रो. प्रतीक जैन व सन २०२२-२३ चे अध्यक्ष रो. किर्तीकुमार कोठारी व सचिव रो.ताहा बुकवाला व आधार बहुद्देशीय संस्थेचे श्रीमती रेणू मॅडम, अध्यक्ष डाॅ. भारती पाटील प्रोजेक्ट, चेअरमन रो.अभिजीत भांडारकर व्यासपीठावर उपस्थित होते, रो.आशिष चौधरी यांचे स्वनिर्मित “जैविक घर” या जैविक १५ भाजीपाला निर्मीतीचे साहित्य देऊन श्री.जयपाल हिरे साहेबांचे स्वागत केले. त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आधार संस्थेच्या अश्विनी भदाने यांनी केले कार्येक्रमात समारोप प्रसंगी एच आय व्ही सोबत जगणाऱ्या अनाथ मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले. व श्री.जयपाल हिरे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले – माणुसकीच्या जगात अमळनेर रोटरी क्लब एच.आय.व्ही. सह जगणाऱ्या अनाथ मुलांना प्रोटीन टिन वाटप करून देवाची पूजा करत आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी मेम्बर्स तसेच आधार संस्थेचे संजय कापडे, तोसिफ खान, मोहिनी पाटील, ज्ञानेश्वर पाटील ,दीप्ती सैंदाणे यांनी सहकार्य केलेआभार प्रदर्शन रो. प्रतीक जैन यांनी केले. रो.विवेक देशमुख, रो.दिलीप भावसार, रो.अहमद बुर्‍हानी, रो.आशिष चौधरी, रो. ईश्वर सैनानी, रो.महेश पाटील, रो. येहमदीं बुरानी व सर्व रोटरी सभासद उपस्थित होते. पी.आर.ओ रो.आशिष चौधरी यांनी अशी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!