आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

कुसगाव बुद्रूक ते खालापूर बोगदा या खोदकामाजवळ चिखलमय रस्ता झाल्याने अपघाताची शक्यता आहे!

रस्ता तसाच सोडल्याने या ठिकाणी चिखल झाला आहे...सुमारे ऐशी कोटी खर्चाचा लोणावळा ते जवण रस्ता दुधिवरे खिंडीतही ठिकठिकाणी उखडला आहे!!

Spread the love

कुसगाव बुद्रूक ते खालापूर बोगदा या खोदकामाजवळ चिखलमय रस्ता झाल्याने अपघाताची शक्यता आहे.

आवाज न्यूज: लोणावळा ता.२८(प्रतिनिधी ) कुसगाव बुद्रूक ते खालापूर बोगदा या खोदकामाजवळ चिखलमय रस्ता झाल्याने अपघाताची शक्यता लोणावळा पवनानगर रस्त्यावर वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे,
लोणावळा ते पवनानगरला जाणाऱ्या रस्त्यावर लोहर आर एम सी समोरही पाण्याचे डबके साचले आहे.चिखलमय रस्ता झाला आहे.

या रस्त्यावर रोज हजारो वाहने जात येत असतात. द्रूतगतीमार्गाच्या खाली पुलामधेही चिखलमय रस्ता व पाण्याच्या डबक्यामुळे वाहनांचे हाल होताना दिसत आहे.
औंढे पूलावर रस्ता खोदल्यामुळे पाणी साचले आहे. तसेच कुसगाव भैरवनाथनगर येथे पुलाजवळ आणि शिर्के बिल्डिंगच्या समोर रस्ता तसाच सोडल्याने या ठिकाणी चिखल झाला आहे…सुमारे ऐशी कोटी खर्चाचा लोणावळा ते जवण रस्ता दुधिवरे खिंडीतही ठिकठिकाणी उखडला आहे , तसेच तो चालण्याचे लायक राहिला असून काही ठिकाणी दगडगोटे खाली येवून अपघाताचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे ..सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्काळ या बाबत निर्णय घ्यावा ,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!