ताज्या घडामोडी

सांगली जिल्हा पोलीस क्रेडिट सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी पाडळीचे पोलीस नाईक संतोष पाटील

Spread the love

शिराळा प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या सांगली जिल्हा पोलीस को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या उपाध्यक्षपदी पाडळी ता.शिराळ्यातील पोलीस दलातील सेवेत नाईक म्हणून कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष पोलीस नाईक संतोष पाटील यांची या क्रेडिट सोसायटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना या निवडीचे पत्र निवडीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत आज देण्यात आले आहे.

संतोष वसंतराव पाटील रा.पाडळी ता. शिराळा यांची सांगली जिल्हा पोलीस कर्मचारी सेवा सोसायटीच्या व्हा चेअरमन पदी निवड झाली विशेष म्हणजे ते गेल्यावेळीही संचालक म्हणून होते. सलग दोन वेळा संचालक व आता व्हाईस चेअरमन असा दुहेरी योग त्यांनी जुळवून आणला आहे.सांगली जिल्हा पोलीस कर्मचारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन पद शिराळा तालुक्याला मिळाल्याने शिराळा तालुक्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा आला.संतोष पाटील हे गेले तेरा वर्ष पोलीस खात्यात कार्यरत आहेत.सध्या ते पोलीस मुख्यालय सांगली येथे नेमणुकीस आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!