ताज्या घडामोडी

डॉ. हरीश शेट्टी यांनी मनुष्याला निरोगी व रोगप्रतिबंधक असणारी ‘आहार वेद ‘ पद्धतीचा लावला शोध

Spread the love

 मुरुम, ता. उमरगा, ता. २९ (प्रतिनिधी) : मुंबई येथील आहारतज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांचे क्रांतिकारी शोध कार्य गेल्या ४० वर्षापासून अखंड सुरु असून त्यांनी आहार वेद पध्दतीत मोठे यश संपादन केले आहे. डॉ. शेट्टी हे ५६ वर्षीय असून ते सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांनी कमी कालावधीमध्ये भोजन व खाद्यपदार्थांवर संशोधन करून मानवी शरीराला निरोगी व रोगप्रतिबंधक करणारी ‘ आहारवेद पद्धती ‘ शोधून ती विकसित करण्यासाठी सातत्याने तीचा प्रचार-प्रसार करीत आहेत. या आहारवेद पद्धतीत तेल, तूप, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ न वापरता भोजन, खाद्यपदार्थ आणि मिठाई तयार केली जावू शकते. सध्याचे फास्ट-फूड म्हणजे स्लो पॉयझनच होय. फास्ट-फूडची सुरवात पाश्चिमात्य देशांनी भारतात व जगात उपलब्ध करून दिली. परंतु या धावपळीच्या जीवनात ही पद्धती अनेकांनी स्वीकारली परंतु आहार तज्ञांच्या मते फास्ट-फूड म्हणजेच स्लो-पॉयझन होय. यामुळे हळूहळू शरीराला आतून पोखरून काढणारे एक प्रकारचे विष होय. यावर उपाय म्हणजे ‘आहार वेद ‘ होय, असे डॉ. हरीश शेट्टी म्हणतात. ऑर्गेनिक म्हणजे सेंद्रिय पद्धतीने उगवलेली धान्य, दाळी, कडधान्य, बाजरी, ज्वारी, फळे, भाज्या इत्यादी पासून आहार वेद चे भोजन व इतर स्नॅक्स तयार केले जाऊ शकतात. सध्या आधुनिक जीवनशैलीत उत्तम, नैसर्गिक, पौष्टिक अन्न खाणे आणि शरीर निरोगी ठेवणे ही काळाची गरज आहे. ‘ यू आर व्हाट यू ईट ‘ असे डॉ. हरित शेट्टी सांगतात. ‘ होश ‘ ची स्थापना करून होश म्हणजे हेल्पिंग अवर सोसायटी हील ! डॉ. हरीश शेट्टी यांनी या संस्थेची तसेच अम्बा-गोपाल फाउंडेशनची ही स्थापना केली आहे. या दोन्ही संस्थांतर्फे गेली पाच वर्ष डॉ. शेट्टी दररोज ५०० पेक्षा अधिक गरजू, गरीब, निराधार व ज्येष्ठ नागरिकांना मोफत ब्रेकफास्ट, लंच व डिनर देत आहेत. नुकताच त्यांचा मुंबईत अंधेरी (पश्चिम) येथे ‘ आहार वेद ‘ हॉटेलमध्ये एक भव्य आहार सोहळा पार पडला. आहार वेद या कार्यक्रमात अनेकांनी लाभ घेतला. नुकतीच त्यांच्या या आहारवेद ची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. स्लो-फूड इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संघटनेने तसेच युनिव्हर्सिटी ऑफ मॅस्ट्रोनोमिकल सायन्सेस (खाद्यान्न, पक्वान्न, मिष्ठान्न ची युनिव्हर्सिटी) ने ही ‘ आहार वेद ‘ ची दखल घेतली आहे. आगामी जागतिक परिषदेत आहार वेद ची माहिती देण्यासाठी डॉ. हरीश शेट्टी यांना निमंत्रित केले आहे. या त्यांच्या योगदानाबद्दल जगप्रसिद्ध साहित्यिक तथा विश्व शांतीदूत डॉ. सुधीर तारे यांनी त्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे. त्यांनी त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!