आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई.) बोर्डच्या शांभवी व कु. श्रावणी सुजित पुराणिक या जुळ्या भगिनींनी राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.

Spread the love

      पिंपरीचिंचवड:प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई.) बोर्डच्या शांभवी व कु. श्रावणी सुजित पुराणिक या जुळ्या भगिनींनी राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
चिंचवड 18 ः चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई.) बोर्डच्या इयत्ता 8 वीत शिकणार्‍या कु.शांभवी व कु. श्रावणी सुजित पुराणिक यांनी आंतरराष्ट्रीय नृत्य परिषद, पॅरीस (फ्रान्स) सीआयडी संचलित अधिकृत सदस्य असणारी पुणे येथील अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशनच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर पुणे येथे नृत्य, नाटक, संगीत उत्सव स्पर्धा संपन्न झाली. त्यात भरतनाट्यमच्या ज्युनिअर सेमी क्लासिकल या गटात या जुळ्या भगिनींनी प्रथम क्रमांक पटकाविला त्यांना ‘सुर नवा, ध्यास नवा’ महाविजेता फेम रविंद्र खोमणे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक प्रमोद ननावरे, परिक्षक अनिरुद्ध देशपांडे प्रफुल्ल गेहलोत आदी मान्यवर उपस्थित होते.
कु. शांभवी व श्रावणी या जुळ्या भगिनी लहानपणापासूनच नृत्य साधना करीत असून त्यांचे भरत नाट्यमचे पदवी शिक्षणही पूर्ण झाले असून चिंचवड येथील कलाश्री नृत्यशाळेत सदस्या पुढील शिक्षण घेत आहे. त्याच्या दैदिप्यमान यशानिमित्ताने संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा व स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस, शिक्षक वृन्दानेही कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!